लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये;या तारखेला खात्यात होणार जमा | Majhi Ladki Bahin Yojana Payment

Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment : राज्य सरकारने या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची घोषणा होताच राज्यभरातील महिलांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला लांबच लांब रांगा लाऊन अर्ज दाखल करत आहेत. ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरले जात आहेत, या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

राज्यातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यावर सरकार दर महिना ही रक्कम पाठवणार आहे. पण याचा पहिला हफ्ता कधी मिळणार? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana when will get 1st Installment to maharashtra women)

कधी मिळेल पहिला हफ्ता?

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता हा 3000 रूपयांचा असणार आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत, हे पैसे 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील पात्र महिलांना अर्ज करावा लागणार आहे.

महिला या योजनेचा फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने भरू शकतात. अर्ज भरल्यानंतर पात्र असाल तर सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात जारी करणार आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला सुद्धा या सरकारी योजनेचा लाभ घ्यायची इच्छा असेल, तर हि पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना लागू करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेला जुना डेटा यासाठी घेण्यात येणार आहे. इतर योजनेतील लाभार्थी महिलांची माहिती त्यामुळे सरकारला मिळणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

लाडकी बहीण योजनेसाठी (Majhi Ladki Bahin Yojana) अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

महाराष्ट्रातील जवळपास अडीच कोटी महिलांना याचा योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे मिळालेली आहे, इतक्या महिलांची माहिती घेऊन ती पडताळणी करणे इतक्या कमी वेळात शक्य नाही. त्यामुळे सरकारने ही युक्ती लढवली आहे.

31 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत, त्यानंतर 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

योजनेचा लाभ फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार

या योजनेसाठी महिलांनी अर्ज केल्यास त्यांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा Majhi Ladki Bahin Yojana पहिला हप्ता मिळणार आहे. याशिवाय, ज्या महिलेने या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केलेत. त्यांनाच योजनेचा पहिला हप्ता मिळेल. अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

Ramai Awas Yojana 2024 : रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज सुरु; पात्रता व आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज

1 thought on “लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये;या तारखेला खात्यात होणार जमा | Majhi Ladki Bahin Yojana Payment”

Leave a Comment