PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
ही भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राबविण्यात येत असून उमेदवाराने पदानुसार आपले अर्ज आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
Pune Municipal Corporation Invited applications for various posts under CMYKPY Scheme of Government of Maharashtra, Eligible and Interested candidates should be apply before mentioned dates to get job at PMC, Pune.
👉पदांचा तपशील
- संगणक ऑपरेटर
- माळी
- वेल्डर
- सुतार
- पेंटर
- टर्नर
- पंप ऑपरेटर कम मेकॅनिक
- कनिष्ठ अभियंता
- ऑटो इलेक्ट्रिशियन व इतर
👉शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी-बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक पात्रता बारावी पास/आयटीआय/पदविका/ पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
- पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
👉पदसंख्या : एकूण 682 रिक्त जागांकरिता ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
👉अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 14 ऑगस्ट 2024
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024
👉अर्ज कोठे करावा : उमेदवारांनी अर्ज https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या ऑनलाइन लिंकद्वारे करावा.
10 वी पास विद्यार्थ्यांना दर महिना 3500 रुपये शिष्यवृत्ती; ऑनलाईन अर्ज करा
👉प्रशिक्षण कालावधी : सहा महिने
👉पगार : सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत दरमहा पगार हा 6000 ते 10000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा.
- उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
- उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
- उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरून नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
- इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे, व पोर्टलवरील पदांसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.
- भरतीचे इतर सर्व अधिकार समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
PMC Pune Recruitment 2024
☑️मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
☑️अधिकृत संकेतस्थळ : https://rojgar.mahaswayam.gov.in
हे ही वाचा…👇
BMC : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी;आज या ठिकाणी मुलाखत…