Free Flour Mill 2024 : जिल्हा परिषदेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अर्ज सुद्धा मागविले जातात व त्याची जाहिरात सुद्धा केली जाते.
विविध ठिकाणी या योजनेविषयीची माहिती नसते तसेच गावातील नागरिकांना याविषयी खूपच कमी माहिती असते त्यावेळेस गावातील मोठे किंवा शिक्षित उमेदवार या योजनेचा लाभ घेतात व बाकीचे नागरिक लाभ घेऊ शकत नाहीत.
आमच्या संकेतस्थळावर अशा विविध योजना विषयीची माहिती दिली जाते जे सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे हीच माहिती तुम्हाला मोफत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा, तसेच व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.
जिल्हा परिषद सातारा कृषी विभाग अंतर्गत जिल्हा परिषद स्वनिधीतील वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत 2024-25 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज त्या त्या पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे, अर्जाचा नमुना खाली दिलेला असून योजना विषयीची माहिती सुद्धा खाली दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये आहे.
योजनांचा तपशील
◾कृषी विभाग
- २ एचपी विद्युतचलीत कडबाकुटी यंत्र (विद्युत मोटारीसह) पुरविणे या योजनेसाठी अर्ज
- ट्रक्टर चलीत रोटाव्हेटर
- कृषी यांत्रिकीकरण – पल्टी नांगर, पाचट कुटी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, पेरणी यंत्र इ.
- पॉवर विडर अनुदान
◾पशुसंवर्धन विभाग
- जिल्हा परिषद अंतर्गत कामधेनु आधार योजना – ०१ दुधाळ म्हैस किंवा संकरीत/देशी गाय वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभ मिळणेसाठी महिला लाभार्थींनी करावयाचा अर्ज
- जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थीस ५० टक्के अनुदानावर (५ शेळी व १ बोकड) वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभार्थींनी करावयाचा अर्ज
◾समाज कल्याण विभाग
- विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग व्यक्तीकरिता लॅपटॉप (शैक्षणिक साहित्य) पुरविणे
- जि. पं. ५ टक्के निधीतून राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय/तालुका स्तर प्राविण्य मिळवलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य पुरविणे
- दिव्यांग लाभार्थींना तीनचाकी सायकल पुरविणे
- दिव्यांग लाभार्थींना ३ चाकी स्कूटर पुरवणे याकरिता अर्थसहाय्य पुरविणे
- अतितीव्र दिव्यांग लाभार्थींना निर्वाह भत्ता देणे
◾महिला व बाल कल्याण विभाग
- ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी (सर्वसाधारण) अर्थसहाय्य पुरविणे
- ग्रामीण भागातील महिलांना पिकोफॉल मशीन करिता अर्थसहाय्य पुरविणे
- ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना इ. ७ वी ते इ. 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण अर्थसहाय्य पुरविणे
- ग्रामीण भागातील इ. ५ वी ते इ. 12 पर्यंत शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल अर्थसहाय्य पुरविणे
- ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी (विशेष घटक) अर्थसहाय्य पुरविणे
वर नमूद केलेल्या विविध प्रकारच्या योजनेसाठी जिल्हा परिषद सातारा अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत यासाठी अनुदानाची मर्यादा 50% पासून 100%पर्यंत असणार आहे.
विविध प्रकारच्या अनुदानाची माहिती खालील प्रसिद्धी पत्रकामध्ये आहे, उमेदवाराने प्रसिद्धीपत्रक व्यवस्थित रित्या वाचावे व त्यानंतर अर्ज सादर करावा.
◾आवश्यक कागदपत्रे
- शेतीचा 8अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- रेशन कार्ड
- पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पशुधन उपलब्धतेचे प्रमाणपत्र
- सिंचन सुविधा पुरावा
- ट्रॅक्टरचे आरसीटीसी बुक इत्यादी
◾महत्वाच्या सूचना
- अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचा अर्ज सोबत समक्ष प्राधिकार्यांची जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
- अर्जदार अपंग प्रवर्गातील असल्यास सक्षम प्राधिकार्यांच्या कडील अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
- अर्जदार महिला असल्यास महिलेच्या नावे शेतीचा 8अ उतारा आवश्यक राहील.
- प्रवर्गनिहाय राखीव लाभाचे प्रमाण अनुसूचित जाती 15 टक्के, अनुसूचित जमाती 7.5 टक्के, अपंग 5 टक्के महिला 30 टक्के व उर्वरित इतर नागरिकांसाठी असतील.
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र महिला , विद्यार्थी व नागरिकांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनेअर्ज सादर करायचे आहेत
Free Flour Mill 2024 | Mofat Pith Girni Yojana | Zilla Parishad Yojana
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा
हे हि वाचा…
Buy Cars at Low Prices : बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करा; 01 लाखात कार तर 15 हजारात बाईक
एचडीएफसी बँकेकडून 75000 रुपये शिष्यवृत्ती;येथे करा अर्ज | HDFC Bank Scholarship 2024
3 लाख रुपयांचे कर्ज कागदपत्रांशिवाय,CIBIL स्कोर आणि उत्पन्नाचा पुरावा सुद्धा लागणार नाही
जन्माचा दाखला असा काढा ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून,पहा पूर्ण प्रोसेस | Birth Certificate Online
1 thought on “सरकारी अनुदानावर मोफत पिठाची गिरणी, सायकल,पिको फॉल मशीन, सायकल व इतर वस्तूंचे वाटप सुरु; ऑनलाईन अर्ज करा”