लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…

Ladki Bahin Yojana Form Correction : सध्या राज्यात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत आहेत.

पण अनेक महिला शिक्षीत नसल्यामुळे अर्ज दाखल करताना त्यांच्याकडून अनेक चुका होत आहेत. या चुकांमुळे भविष्यात आम्हाला महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल की नाही, अशी शंका महिलांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकदा चूक झालेल्या अर्जात पुन्हा दुरुस्ती करता येते का? असे विचारले जात आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येईल अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून अर्ज दाखल करण्याची मुभा आहे. महिला राज्य सरकारच्या नारी शक्ती अॅपच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात.

तसेच ऑनलाईन पोर्टलवरूनही हा अर्ज दाखल करता येईल. ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या अर्जाचे नंतर व्हेरिफिकेशन केले जाते. त्यामुळे अर्जात चुका झाल्यास त्यात नंतर बदल करता येतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पेंडिंग टू सबमीटचा अर्थ काय?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

दरम्यान, अर्ज भरल्यानंतरही तुम्हाला त्यात दुरुस्ती करता येते. त्यासाठी तुम्हाला नारी शक्ती अॅप आणि लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पर्याय दिसेल. तुम्ही एकदा अर्ज दाखल केल्यानंतर तो In Pending To Submitted  असे दिसेल.

पेंडिंग हा शब्द वाचून घाबरून जाण्याची गरज नाही. या इंग्रजी ओळीचा सरळ अर्थ हा तुमचा अर्ज सबमीट झाला असून तो प्रशासकीय पातळीवर पडताळला जात आहे, असा होतो. म्हणजेच तुमचा अर्ज शासनदरबारी सबमीट झाला आहे आणि त्याची सध्या पडताळणी केली जात आहे. तुमचा अर्ज मंजूर आहे की तो नामंजूर करण्यात आलाय हे नंतर समजेल.

असा करा फॉर्म दुरुस्त

In Pending To Submitted याच ऑप्शनखाली तुम्हाला तुमचा अर्ज दुरुस्त करण्याची संधी आहे. निळ्या पट्टीमध्ये In Pending To Submitted असं लिहिलेले आहे. त्याच्या खालच्याच केशरी रंगाच्या पट्टीत Edit Fofm असा ऑप्शन दाखवलेला असतो.

याच ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या अर्जात बदल करता येईल. तुम्हाला हवा तो बदल करून तुम्ही तुमचा अर्ज पुन्हा सबमीट करू शकता. म्हणजेच तुम्हाला तुमच्या अर्जात दुरुस्ती करता येते.

दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या सर्व अर्जांची सध्या छाननी चालू आहे. लवकरच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

1 thought on “लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…”

  1. अर्ज रेजेक्ट झाला आहे व resubmit करा असा संदेश आला आहे resubmit करायला गेलो तर आधार नंबर टकलावर ओटीपी येत नाही काय करावे अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून त्यांचा ही ॲप वरून होत नाही

    Reply

Leave a Comment