Mobile Tower Business Idea : आपण पेपर मध्ये मोबाईल टॉवर लावून महिन्याला 70-80 हजार मिळवा अश्या जाहिराती वाचत असाल आणि काही वेळेला आपण त्यांना कॉल पण करत असाल पण या सर्व जाहिराती खोट्या असतात.
टॉवर लावण्यासाठी ते तुमच्याकडून पैसे मागतात आणि तुमची फसवणूक होते, टॉवर आपण लावू शकतो पण एकही रुपया खर्च न करता, ते कसे लावाल या विषयी माहिती खाली दिलेली आहे.
तुमच्या मोकळ्या जागेत किंवा छतावर मोबाईल कंपनीचा टॉवर (Mobile Tower) लावून महिन्याला तुम्ही 50 हजार ते 75 हजार रुपयापर्यंत संबंधित कंपनी मार्फत भाडे मिळवू शकता.
यामध्ये एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपनीचे टॉवर्स तुम्ही आपल्या घरावरच्या छतावर किंवा शेताच्या ठिकाणी तुम्ही या टॉवरची उभारणी करू शकता यासाठी काही अटी आणि पात्रता आहेत.
त्या सविस्तर वाचा आणि त्यानंतर अर्ज करा, पेपरमध्ये येणाऱ्या जाहिरातीला बळी न पडता शंभर टक्के तुम्हाला टॉवर कसा लावता येईल याची माहिती इथे पाहू शकता.
तुम्हाला टॉवर लावण्यासाठी कुठेही पैसे देण्याची गरज पडत नाही, सर्व खर्च ही संबंधित कंपनी करते त्यामुळे जर कोणी टॉवर लावण्यासाठी पैसे मागत असेल तर कोणालाही पैसे देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, खाली दिलेल्या तीन-चार पद्धती ने तुम्ही घरावर किंवा मोकळ्या जागेवर टॉवर लावू शकता.
◼️जागा किती लागते
घराच्या छतावर टॉवर लावणार असाल – 500 स्क्वेअर फुट जागा असावी, मोकळ्या जागेमध्ये शहरी भागात तुम्ही टॉवर लावणार असाल – तर 2000 हजार स्क्वेअर फुट जागा असावी, आणि ग्रामीण भागामध्ये मोकळ्या जागी तुम्ही टॉवर लावणार असाल तर – अडीच हजार स्क्वेअर फुट जागा तुमच्याकडे असणे गरजेची आहे.
◼️आवश्यक कागदपत्रे
स्टॅबिलिटी सर्टिफिकेट, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र, जागेचे कागदपत्र (सातबारा अथवा Index-2), कंपनी सोबतचा करारनामा.
◼️किती पैसे मिळतात
घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत ग्रामीण भागात तुम्ही टॉवर लावणार असाल तुम्हाला 7000 ते 50 हजाराच्या दरम्यान मोबदला मिळतो तर शहरी भागात तुम्ही टॉवर लावणारा असाल तर हा मोबदला 50 हजार ते 1.5 लाखाच्या दरम्यान तुम्हाला मिळू शकतो.
◼️कंपनी कधी टॉवर लावत नाही (Mobile tower installation company)
टॉवर लावण्याच्या ठिकाणापासून 100 मीटर वर कोणता दवाखाना असेल तर कंपनीची तिथे टॉवर लावत नाही, किंवा तुमच्या जवळपास राहणाऱ्या कोणी तक्रार केली तरी कंपनी तिथे टॉवर लावत नाही,
कोणकोणत्या कंपन्या सहभागी
सर्वांना माहिती असणारे जिओचं जिओ नेटवर्क पार्टनर (Jio Network Partner) हे जिओचे अधिकृत टॉवर लावणारी कंपनी आहे, दुसरी कंपनी आहे एटीसी इंडिया (American Tower Company) ही कंपनी अमेरिकन टॉवर कंपनी म्हणून ओळखली जाते या कंपनीमार्फत सुद्धा तुम्ही टॉवर लावू शकता.
ही सुद्धा एक अधिकृत कंपनी आहे जवळपास 75 हजार 700 साइट्स संपूर्ण भारतामध्ये बनवलेले आहेत तिसरी कंपनी आहे आणि सर्व भारतामध्ये सर्वाधिक प्रचलित असलेली इंडस टॉवर्स (Indus Towers) ही सुद्धा अधिकृत कंपनी आहे.
भारतामध्ये टॉवर लावण्यासाठी आणि वर नमूद केलेल्या कंपनीमध्ये अर्ज करून तुम्ही सोप्या पद्धतीने सहज टॉवर लावू शकता, यांच्या प्रक्रिया शक्यतोवर ऑफलाईन होतात पण अर्ज किंवा इन्क्वायरी तुम्हाला ऑनलाईन करावी लागते.
ऑनलाइन तुमचा तो इन्क्वायरी फॉर्म भरायला लागतो आणि त्यानंतर त्यांचे जे अधिकृत एक्झिक्युटिव्ह असतात ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात, आणि त्यानंतर जर तुम्ही पात्रतेत बसत असाल तर तुम्हाला तिथे टॉवर लावता येतो.
Mobile Tower Business Idea | Mobile tower installation company | Mobile Tower Company List
हे हि वाचा…
Buy Cars at Low Prices : बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करा; 01 लाखात कार तर 15 हजारात बाईक
एचडीएफसी बँकेकडून 75000 रुपये शिष्यवृत्ती;येथे करा अर्ज | HDFC Bank Scholarship 2024
3 लाख रुपयांचे कर्ज कागदपत्रांशिवाय,CIBIL स्कोर आणि उत्पन्नाचा पुरावा सुद्धा लागणार नाही
जन्माचा दाखला असा काढा ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून,पहा पूर्ण प्रोसेस | Birth Certificate Online
मलां माझ्या शेतात टॉवर लावाय चे आहे काही अडथळ नाही