Created by Aditya, Date 24.11.2024
Van Vibhag Bharti 2024 : पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय भारत सरकार अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, या भरतीमध्ये वेगवेगळ्या चार पदांचा समावेश आहे या चार पदांच्या वेगवेगळ्या 16 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे, हे अर्ज 30 नोव्हेंबर 2024 संध्याकाळी दहा वाजेच्या आत सादर करणे गरजेचे आहे, मल्टी टास्किंग स्टाफच्या आठ जागा आहेत, लोवर डिव्हिजन कलर्क ची एक जागा आहे.
टेक्निशियन (फिल्ड व लॅब) साठी तीन जागा आहेत तर टेक्निकल असिस्टंट साठी चार रिक्त जागांचा समावेश आहे. वेगवेगळ्या पदा नुसार शैक्षणिक पात्रता दर्शविण्यात आली असून मल्टी टास्किंग स्टाफ साठी दहावी पास, लोअर डिव्हिजन क्लार्क साठी बारावी पास, टेक्निशियन साठी बारावी व संबंधित विषयात पदविका धारण केलेली असावी तर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले असणे आवश्यक आहे.
या ठिकाणी अर्ज करण्यासाठी वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. वयाची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे या ठिकाणी जो पगार मिळणार आहे तो दरमहा 18 हजारापासून 29 हजार दोनशे रुपये पर्यंत असणार आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल आणि पात्रता धारण करत असाल तर लवकरात लवकर खाली लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करा आणि व्यवस्थितरीत्या वाचा आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.
या पदभरतीसाठी विविध पदांसाठी वेगवेगळी फी सुद्धा आकारण्यात आली असून प्रोसेसिंग फी व एक्झाम फी वेगवेगळी राहणार आहे.
या शुल्क ची माहिती तुम्ही पाहू शकता, आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे असून ऑनलाईन अर्ज 08 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाले तर 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत हे अर्ज चालू राहणार आहेत.
या अर्ज साठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला खाली लिंक वरून नमूद केलेले तारखे अगोदर अर्ज भरायचे आहेत यासाठी विविध अटी शर्ती व पात्रता सुद्धा दाखवण्यात आल्या असून त्या सुद्धा जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |