Thane DCC Bank Bharti 2025 : ठाणे डीसीसी बँकेत 08 वी पासवर शिपाई, वाहन चालक व इतर पदांची मेगा भरती

Thane DCC Bank Bharti 2025 : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे यांच्या स्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

याकरिता इच्छुक व पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत, यासाठी उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • ज्युनियर बँकिंग असिस्टंट
  • शिपाई
  • सुरक्षा रक्षक
  • वाहन चालक
पदसंख्या
  • एकूण -165 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 8 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
नोकरीचे ठिकाण
  • ठाणे

पगार Bank Bharti

  • यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 15000 व जास्तीत जास्त 20000 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.
अर्ज पद्धती
  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

  • 18 ऑगस्ट 2025

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 29 ऑगस्ट 2025

वयोमर्यादा DCC Bank Bharti

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क
  • शिपाई, सुरक्षारक्षक आणि वाहन चालक – 590 रुपये
  • ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – 944 रुपये

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना  (Thane DCC Bank Bharti 2025)

  • ऑनलाइन परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज भरता येणार आहे, एकदा ऑनलाईनद्वारे अपलोड केलेल्या अर्जात पुन्हा दुरुस्ती करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्यासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
  • अपात्र अर्जदार सोबत कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला जाणार नाही, सदर भरती प्रक्रिये दरम्यान वरील दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्यावत माहिती प्रक्रियेची अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे.
  • रिक्त पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे, कोणत्याही कारणास्तव पदे वाढल्यास उपलब्ध निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारातून सदरची रिक्त पदे भरण्यात येतील याबाबतचे सर्व अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत.
  • तसेच भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे देखील अधिकार बँकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे, उमेदवाराने अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा सत्य माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.भरती कोणासाठी आहे?

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

2.शैक्षणिक पात्रता काय आहे?

किमान 8वी उत्तीर्ण आवश्यक, पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा.

3.नोकरीचे ठिकाण कोणते?

ठाणे जिल्हा

4.पगार किती मिळेल?

किमान ₹15,000 ते कमाल ₹20,000 पर्यंत (पदानुसार फरक संभवतो)

5.अर्ज कसा करायचा?

अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे.

Leave a Comment