Close Visit MahaNews12

लाडकी बहीण योजनेची eKYC झाली कि नाही अश्या पद्धतीने चेक करा | Ladaki Bahin eKYC Status Check

Ladaki Bahin eKYC Status Check : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC अनिवार्य महाराष्ट्र शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आता e-KYC प्रक्रिया आवश्यक करण्यात आली आहे. ही योजना महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली असून, लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. काही वेळापूर्वी अदिती तटकरे यांनी केलेल्या ट्विट नुसार पुढील 2 महिन्यात तुम्हाला eKYC करणे अनिवार्य आहे जर नाही झाली तर मिळणार लाभ थांबला जाऊ शकतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

e-KYC का गरजेचे आहे?

  • खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी: आधार आधारित डिजिटल पडताळणीमुळे अपात्र किंवा बनावट अर्जदारांना वगळता येते.
  • अनियमितता टाळण्यासाठी: यापूर्वी काही अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचे आढळले होते. e-KYCमुळे हे थांबवता येते.
  • वेळेवर निधी वितरणासाठी: सन्मान निधी थेट बँकेत जमा होतो, त्यामुळे कोणताही अडथळा येत नाही.
  • पारदर्शकता वाढवण्यासाठी: योजना अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित बनते.

बनावट वेबसाइट्सपासून सावध!

e-KYC करण्यासाठी फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळ वापरा. कोणत्याही खाजगी किंवा अनोळखी वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती भरू नका.

👉 अधिकृत संकेतस्थळ: https://ladakibahin.maharashtra.gov.in

e-KYC प्रक्रिया कशी करावी?

  1. संकेतस्थळावर ‘e-KYC’ पर्याय निवडा.
  2. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका.
  3. नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP भरून प्रमाणीकरण पूर्ण करा.
  4. त्यानंतर वडिलांचं किंवा पतीचा आधार नंबर टाकून प्रमाणित करा
  5. यशस्वी पडताळणीनंतर ‘e-KYC यशस्वी’ असा संदेश दिसेल.

eKYC झाली कि नाही कसे चेक करावे?

वर नमूद केलेल्या संकेतस्तहलवर जावे आणि लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकावा, त्यानंतर CAPTCHA टाकून आधार प्रमाणीकरणांच्या संतीला मी सहमत आहे ला क्लीक करावे त्यानंतर OTP पाठवा ला क्लीक करावे. जर वॉर्निंग मध्ये या आधारच KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज आला तर समजायचं आपली KYC झालेली आहे.

आवश्यक गोष्टी:
  • आधार क्रमांक
  • आधारशी जोडलेला मोबाईल नंबर
  • आधार लिंक केलेले बँक खाते

सुरक्षिततेसाठी टिप्स

  • OTP किंवा आधार क्रमांक कोणाशीही शेअर करू नका.
  • फक्त अधिकृत पोर्टल वापरा.
  • शंका असल्यास अधिकृत मदत केंद्राशी संपर्क साधा.

ही प्रक्रिया जलद, कागदविरहित आणि सुरक्षित आहे. वेळेत e-KYC पूर्ण केल्यास योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील.

e-KYC करण्यासाठी इथे क्लीक करा
e-KYC Status पाहण्यासाठीइथे क्लीक करा

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

FAQ

1.लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC का आवश्यक आहे?
अपात्र लाभार्थींना वगळण्यासाठी आणि निधी थेट बँकेत पाठवण्यासाठी e-KYC अनिवार्य आहे.

2.e-KYC म्हणजे काय?
आधारद्वारे डिजिटल ओळख पडताळणी करणारी प्रक्रिया.

3.कशी करावे e-KYC ?
अधिकृत पोर्टलवर आधार क्रमांक व OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करावी.

4.कोणती माहिती लागते?
आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल नंबर, आणि आधार लिंक केलेले बँक खाते.

5.e-KYC न केल्यास काय होईल?
योजनेचा आर्थिक लाभ मिळणार नाही

Leave a Comment