IPPB Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात वाचावी आणि पात्रता धारण करीत असल्यास अर्ज सादर करावा हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे अर्ज 02 ऑगस्ट 2025 पासून 25 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करू शकणार आहात.
पदांचे तपशील व इतर माहिती
- डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्स – 01 जागा
- जनरल मॅनेजर फायनान्स – 01 जागा
- चीफ एचआर ऑफिसर – 01 जागा
- चीफ कंप्लायन्स ऑफिसर – 01 जागा
- चीफ ऑपरेटिंग ऑफिसर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवीत तर उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार हा सीए किंवा उमेदवाराकडे सीएआयबी एमबीए किंवा सर्टिफिकेशन असणे आवश्यक आहे नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे ऑनलाइन अर्ज 2 ऑगस्ट 2025 सकाळी दहा वाजेपासून 25 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत करता येणार आहे या पदभरती मध्ये उमेदवाराचे वय कमीत कमी 35 वर्ष आणि जास्तीत जास्त 55 वर्ष असणे आवश्यक आहे हे वय 01 जुलै 2025 रोजी चे गणले जाईल याची नोंद घ्यावी.
निवड प्रक्रिया
अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाची पडताळणी करून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल व मुलाखती द्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल याविषयीची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती जाहिरात खाली लिंक वरून डाऊनलोड करून सविस्तर वाचू शकता.
अर्जाचे शुल्क (IPPB Bharti 2025)
ऑनलाईन अर्ज करते वेळेस उमेदवाराला ऑनलाइन परीक्षा शुल्क भरायचे आहे यामध्ये अनुसूचित जाती/जमातीसाठी 150 रुपये व इतर प्रवर्गासाठी 750 रुपये अर्जाचे शुल्क म्हणून घेतले जाणार आहे. एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत माघारी दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मासिक वेतन
या पदाभरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 120940 ते 173860 रुपये एवढा मासिक पगार देण्यात येईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया व इतर
सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे अर्ज करण्या अगोदर पात्रता जाणून घ्यावी व त्यानंतर अर्ज सादर करावा. मुलाखतीसाठी उमेदवाराला कोणत्या प्रकारचे भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवाराला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास जाहिरातीमध्ये दिलेले ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकणार आहात.
या पदभरती मध्ये अर्जाच्या शुल्का व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारले गेलेले नाही तसेच उमेदवार आणि या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क कोणालाही देऊ नये तसेच कोणताच आर्थिक व्यवहार करू नये व आपली फसवणूक होण्यापासून वाचावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 120940 ते 173860 रुपये पर्यंत पगार मिळेल.
4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अनुसूचित जाती/जमातीसाठी 150 रुपये व इतर प्रवर्गासाठी 750 रुपये