Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे.
हि मुलाखत 03 फेब्रुवारी 2026 रोजी (नोंदणी वेळ: 09:00 ते 12:00 वाजेपर्यंत) घेतली जाणार आहे. तरी इच्छुक उमेदवाराने अर्ज सादर करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास मुलाखतीस हजार रहावे.
पदांचा तपशील
- बहुउद्देशीय आरोग्य कामगार – 06 जागा
शैक्षणिक पात्रता
- कमीत कमी 12वी पास व संबंधित विषयात डिप्लोमा आवश्यक
रेल्वेमध्ये 5810 पदांची मोठ्ठी भरती सुरु! ऑनलाईन अर्ज सुरु | Railway Recruitment 2026
पगार Konkan Railway Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना कमीत कमी 35,500/- जास्तीत जास्त 40,500/- पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा
- 01 जानेवारी 2026 रोजी उमेदवारांचे वय कमाल वयोमर्यादा 32 वर्ष असणे आवश्यक आहे.
मुलाखतीची तारीख
- 03 फेब्रुवारी 2026 रोजी (नोंदणी वेळ: 09:00 ते 12:00 वाजेपर्यंत)
अर्ज भरण्याच्या सूचना
- केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल, उमेदवारांना मुलाखतीपूर्वी त्यांची पात्रता तपासण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उमेदवारांनी वर नमूद केलेल्या अनिवार्य कागदपत्रांची स्वतः साक्षांकित छायाप्रत जसे की वय, जात, शैक्षणिक पात्रता तसेच गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र, असल्यास जोडणे आवश्यक आहे.
- माजी सैनिक/अपंगत्व इत्यादी दाव्यांच्या समर्थनार्थ प्रमाणपत्र, जर उमेदवार मुलाखतीसाठी पात्र नसेल तर तो मुलाखतीसाठी पात्र राहणार नाही उमेदवाराने राजपत्रित अधिकारी/कार्यकारी अधिकाऱ्यांकडून एक अक्षराचे प्रमाणपत्र आणावे जेणेकरुन तो/ती चांगली नैतिक चारित्र्य बाळगत असल्याचे प्रमाणित होईल, अपूर्ण किंवा अस्पष्ट शैक्षणिक पात्रता अवैध ठरेल.
नोकरीचे ठिकाण
- नवी मुंबई
मुबई उच्च न्यायालयात ८,२८२ सुरक्षा रक्षक पदांसाठी भरती;०७वी ते १०वी पास आवश्यक
आवश्यक कागदपत्रे
अ) पात्रतेच्या पुराव्याच्या प्रती (सूचनेत नमूद केलेल्या पात्रतेनुसार
परिशिष्ट)
ब) जन्मतारखेच्या पुराव्याची प्रत (SSLC/SSC प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र)
क) केंद्र सरकारच्या नोकरीसाठी आवश्यक असलेल्या नमुन्यातील जातीच्या प्रमाणपत्राची प्रत (SC/OBC-NCL च्या बाबतीत) आणि माजी सैनिकांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ सेवा प्रमाणपत्र, जर असेल तर.
EWS उमेदवाराच्या बाबतीत, केंद्र सरकारच्या नोकरीसाठी आवश्यक असलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र (फॉर्मेट जोडलेले)
ड) दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो.
ई) मागील नियोक्त्याने दिलेला अनुभव प्रमाणपत्र.
फ) राजपत्रित अधिकारी/कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेले चारित्र्य प्रमाणपत्र जे तो/ती
चांगली नैतिक चारित्र्य बाळगत असल्याचे प्रमाणित करते.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवाराने मुलाखतीदरम्यान अर्ज भरावा, अर्जाचा नमुना खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
मुलाखतीचे ठिकाण
एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवुड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवुड्स (पश्चिम), नवी मुंबई. या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Questions)
1.भरती कुठे आहे ?
Ans: हि भरती कोकण रेल्वेमार्फत नवी मुंबई येथे आहे.
2.निवड कशी होणार आहे?
Ans: येथे मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
3.मुलाखत कधी आहे?
Ans:03 फेब्रुवारी 2026 रोजी मुलाखत घेतली जाईल.
4.मुलाखतीसाठी भत्ता मिलेल का?
Ans: नाही, मुलाखतीला स्वखर्चाने जायचे आहे.
5.मुलाखतीसाठी कोणते कागदपत्रे घेऊन जाऊ?
Ans: वर नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत न्यावेत.
