Close Visit MahaNews12

आदिती तटकरे यांची माहिती;नोव्हेंबर चा हप्ता यादिवशी अकाउंटला येणार | ladki bahin nov installment date 2025

ladki bahin nov installment date 2025 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता म्हणजे लाडकी बहीण सन्मान निधी वितरित करण्यासाठी मोठी अपडेट दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता कधी दिला जाईल याची माहिती दिली आहे. 29 नोव्हेंबर पर्यंत रोजी हा निधी विभागाकडे जमा करण्यात आला त्यामुळे सर्व महिलांच्या अकाउंट वर लवकरच जमा केल्या जाण्याची शक्यता आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मागणी क्र.एन-३, २२३५-सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२ समाजकल्याण, ७८९ अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, (०२) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, (०२) (०१) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (कार्यक्रम) ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२३५डी७६७) या लेखाशिर्षाखाली रु.३९६०.०० कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे.

ई-श्रम कार्ड धारकांना दरमहा खात्यात 3000 हजार रुपये | E-Shram Card

अंदाजे 410 कोटी रुपये वितरित होणार

वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.०७.०४.२०२५ रोजीच्या परिपत्रकान्वये सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर २०२५ या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी आवश्यक ती रक्कम लवकरच निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पध्दतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी.

या लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता मिळणार नाही;यादीत नाव चेक करा | Ladki bahin yojana

10 तारखेपर्यंत निधी पाठवण्याच्या सूचना

तसेच उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी.

विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या सजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलाना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेव्दारे दुस-यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी.

हफ्ता कधी जमा होणार?

दिनांक 05 डिसेंबर 2025 पासून हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. महिलांना 10 डिसेंबर पर्यंत हफ्ता अकाउंटला जमा करण्यात येऊ शकते.

लाडकी बहीण योजनेचा नवीन शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा

FAQ

1.नवीन निधी कधी मंजूर होईल?
पुढील 2 दिवसात निधी मंजूर केला जाऊ शकते.

2.किती निधी वितरित करण्यात येईल?
₹410 कोटी निधी वितरित करण्यात येईल.

3.हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होईल?
05 डिसेंबर 2025 पासून हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल.

4. दरमहिना किती रक्कम मिळते?
पात्र महिलांना दरमहा ₹1,500 मिळतात.

5. कोणत्या महिलांना लाभ मिळतो?
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांना लाभ दिला जातो.

Leave a Comment