Close Visit MahaNews12

काहीही होवो,सरकार 100% कर्जमाफी करणारच;देवेंद्र फडणवीस यांची माहिती | Loan Waiver Scheme

Loan Waiver Scheme : एकीकडे विरोधकांकडून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचा आरोप करण्यात येत असताना विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शेतकरी कर्जमाफीबाबत ठोस भूमिका मांडली.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

राज्याला परवडणारे असो किंवा नसो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा, हा सरकारचा प्रयत्न असून, त्यासाठी परदेशी समिती अभ्यास करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चहापानानंतर मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी सरकारची ही भूमिका मांडली.

जात राज्य दिवाळखोरीकडे असल्याची विरोधक टीका करीत आहेत. प्रत्यक्षात त्यांना राज्याला तसे दाखवायची घाई झाली आहे. राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची आहे. मात्र, दिवाळखोरीची कुठलीही स्थिती नाही. उलट राज्यात अनेक योजना कार्यान्वित असून, केंद्र शासनाच्या निकषांप्रमाणे राज्याची कामगिरी समाधानकारक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

९२ टक्के पूरबाधित शेतकऱ्यांना मदत

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीचा लेखाजोखाच मांडला. राज्यातील ९२ टक्के पूरबाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली असून, हा आकडा २० लाखांच्या वर आहे. इतरांच्या केवायसीचा प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

१२ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची केवायसीची समस्या होती. मात्र, त्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. विरोधकांकडून कुठलाही अभ्यास न करता सरकारवर आरोप करण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांना संविधानावर बोलण्याचा अधिकारच नाही

विरोधकांना संविधान व संवैधानिक संस्थांवर अजिबात विश्वास नाही. ते सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, कॅग यांच्यावर सवाल उपस्थित करतात. अशा विरोधकांना संविधानावर बोलण्याचा अधिकारच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

संपूर्ण कर्जमाफीची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पायऱ्यांवरच स्टंट करण्यात स्वारस्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. विरोधक जनतेच्या प्रश्नांपेक्षा विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच स्टंट करण्यात धन्यता मानतात. प्रत्यक्षात यावेळी विरोधक निष्प्रभ आहेत. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत विरोधक नेते घरात व कार्यकर्ते वाऱ्यावर होते. जर निकाल लागला असता, तर विरोधकांची स्थिती आणखी वाईट असती. विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला शिंदे यांनी लगावला.

FAQ

1.कर्जमाफी योजना म्हणजे काय?
शेतकऱ्यांचे थकित कर्ज सरकारकडून माफ करण्याची योजना.

2.मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे?
पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ठाम निर्णय.

3.विरोधकांचा आरोप काय आहे?
राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचा दावा.

4.सरकारचे उत्तर काय आहे?
आर्थिक स्थिती स्थिर असून दिवाळखोरीची भीती नाही.

5.पूरबाधित शेतकऱ्यांना किती मदत मिळाली?
९२% शेतकऱ्यांना मदत, २० लाखांहून अधिक लाभार्थी.

6.KYC समस्या किती शेतकऱ्यांची होती?
१२ लाखांपेक्षा जास्त, त्यातील अर्ध्याहून अधिक सोडवली.

Leave a Comment