Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2026 : महिला व बालविकास विभागात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
महिला बाल विकास विभाग वर्धा अंतर्गत “सपोर्ट पर्सन” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महिला बाल विकास विभाग वर्धा भरती 2026करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2026 आहे.
या भरती प्रक्रिया संदर्भात पदांचा तपशील, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पगार व इतर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
पदांचा तपशील
- सपोर्ट पर्सन
पदसंख्या
- एकूण – 35 रिक्त जागा
10वी उत्तीर्णांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी बंपर भरतीला सुरुवात; त्वरित अर्ज करा
नोकरीचे ठिकाण
- वर्धा
पगार WCD Wardha Bharti 2025
- निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा शासनाच्या नियमानुसार पगार देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज सादर करण्याबाबत वर्धा जिल्हयातील इच्छुक व पात्र उमेदवाराना आपल अज या जाहिरातीच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत खालील नमुद पत्त्यावर सादर करावेत. पत्ता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, द्वारा डॉ. अनुजा इखार यांची इमारत, हिरो शोरुम जवळ, मोहन नगर, नागपूर रोड, वर्धा ता. जि. वर्धा अर्जाची छाननी झाल्यानंतर POCSO सपोर्ट पर्सन नियुक्ती समिती मार्फत मुलाखतीची तारीख पात्र उमेदवारांना कळविण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता
- सामाजिक कार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानसशास्त्र किंवा बाल विकास या विषयात पदव्युत्तर पदवी
किंवा बाल शिक्षण आणि विकास किंवा संरक्षण विषयांमध्ये किमान तीन वर्षांचा अनुभव असलेला पदवीधर आणि एमएससीआयटी/कोणतेही संगणक ज्ञान प्रमाणपत्र.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 11 मार्च 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
- तसेच या भरती प्रक्रिये संदर्भात सर्व कार्यक्रम, वेळापत्रकातील बदल इत्यादी बाबतच्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील,उमेदवारांशी भरती प्रक्रिये बाबत स्वतंत्रपणे पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
- भरती प्रक्रिया स्थगित करणे किंवा रद्द करणे त्यामध्ये अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण किंवा संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे, भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करणे, सामाजिक/समांतर/दिव्यांग इतर आरक्षणांमध्ये संवर्गनिहाय निहाय बदल करण्याचे, सरळ भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे, नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे, अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी राखून ठेवलेले असून त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.
मोफत पीठ गिरणी वाटप अर्ज “या” जिल्ह्यात सुरु;ऑनलाईन अर्ज करा | Free Flour Mill Scheme
- भरती प्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांना राहतील.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,अर्ज पाठवताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडायचे आहेत.
- अर्जदारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- भरती संदर्भात सविस्तर माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
1.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
11 मार्च 2026
3.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
नोकरीचे ठिकाण वर्धा असणार आहे.

5 thoughts on “महिला व बाल विकास विभागात नोकरीची मोठी संधी;पगार 63200 रुपये | Mahila Bal Vikas Vibhag Bharti”