Mofat Shilai Machine 2025 : जिल्हा परिषद पुणे मार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत अर्ज सुद्धा मागविले जातात व त्याची जाहिरात सुद्धा केली जाते. विविध ठिकाणी या योजनेविषयीची माहिती नसते तसेच गावातील नागरिकांना याविषयी खूपच कमी माहिती असते त्यावेळेस गावातील मोठे किंवा शिक्षित उमेदवार या योजनेचा लाभ घेतात व बाकीचे नागरिक लाभ घेऊ शकत नाहीत.
आमच्या संकेतस्थळावर अशा विविध योजना विषयीची माहिती दिली जाते जे सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे हीच माहिती तुम्हाला मोफत मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा, तसेच व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत जिल्हा परिषद स्वनिधीतील वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत 2024-25 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज त्या त्या पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे, अर्जाचा नमुना खाली दिलेला असून योजना विषयीची माहिती सुद्धा खाली दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये आहे.
योजनांचा तपशील
कृषी विभाग (ऑनलाईन अर्ज करा)
- 5 एच. पी. ओपनवेल विदयुत मोटार पंप संच,
- प्लॅस्टिक ताडपत्री (प्लास्टिक ताडपत्री हूक जॉईन्ट 6X6 मिटर)
- 90 एम. एम. पी. व्ही. सी. पाईप,
- बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रे पंप
समाज कल्याण विभाग (ऑनलाईन अर्ज करा)
- १००% टक्के अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ योजना
महिला व बाल कल्याण विभाग (Mofat Girani Yojana 2025) (ऑनलाईन अर्ज करा)
- ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील व आदिवासी क्षेत्रातील (TSP) महिलांना व्यवसायाभिमुख वस्तू पुरविणे (शिलाई मशीन, पीठ गिरणी, सोलार वॉटर हिटर, तेलघाणा)
- डॉ. कमला सोहनी योजना – मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे
- इ. ५ वी ते इ. १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजना
वर नमूद केलेल्या विविध प्रकारच्या योजनेसाठी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत यासाठी अनुदानाची मर्यादा 50% पासून 100%पर्यंत असणार आहे.
विविध प्रकारच्या अनुदानाची माहिती खालील प्रसिद्धी पत्रकामध्ये आहे, उमेदवाराने प्रसिद्धीपत्रक व्यवस्थित रित्या वाचावे व त्यानंतर अर्ज सादर करावा.
आवश्यक कागदपत्रे
- शेतीचा 8अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- रेशन कार्ड
- पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पशुधन उपलब्धतेचे प्रमाणपत्र
- सिंचन सुविधा पुरावा
- ट्रॅक्टरचे आरसीटीसी बुक इत्यादी
महत्वाच्या सूचना
- अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचा अर्ज सोबत समक्ष प्राधिकार्यांची जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
- अर्जदार अपंग प्रवर्गातील असल्यास सक्षम प्राधिकार्यांच्या कडील अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
- अर्जदार महिला असल्यास महिलेच्या नावे शेतीचा 8अ उतारा आवश्यक राहील.
- प्रवर्गनिहाय राखीव लाभाचे प्रमाण अनुसूचित जाती 15 टक्के, अनुसूचित जमाती 7.5 टक्के, अपंग 5 टक्के महिला 30 टक्के व उर्वरित इतर नागरिकांसाठी असतील.
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक तसेच पात्र महिला , विद्यार्थी व नागरिकांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनेअर्ज सादर करायचे आहेत
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा
FAQ (Frequently Asked Questions)
1.हि योजना कोणत्या विभागात आहे?
Ans : वर नमूद केलेल्या विविध विभागात या योजना राबविण्यात नयेत आहेत.
2.या योजनेसाठी कसा अर्ज करावा?
Ans : या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.
3.अनुदान किती मिळेल?
Ans: या योजनेमध्ये १०% पासून ९०% पर्यंत अनुदान दिल्या जाते.
4.अर्ज प्रक्रिया कशी असेल?
Ans: ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर ते पंचायत समिती,जिल्हा परिषद मार्फत अर्ज मंजूर केल्या जाईल.
5.कागदपत्र काय लागतील?
Ans: वर नमूद केलेले सर्व कागदपत्रे आवश्यक आहे त्यामुळे अर्ज करण्याअगोदर कागदपत्रे तयार ठेवावीत.