Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : महापालिकेतील अकरा विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलींच्या प्रस्तावाला गुरुवारी महासभेने मान्यता दिली. या बहुप्रतीक्षित भरतीप्रक्रियेस अखेर महासभेनेही हिरवा कंदील दिल्याने आता अग्निशमन, वैद्यकीय-आरोग्यच्या ७०४ पदांसह विविध विभागांतील अडीच हजार रिक्त पदांच्या जम्बो भरतीची लगबग प्रशासनाकडून सुरू झाली आहे.
महासभेच्या मान्यतेनंतर संबंधित सेवाप्रवेश नियमावली अंतिम मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविली जाणार असून, गेल्या २१ वर्षांपासून वाढीव आस्थापना खर्च, आकृतिबंध आणि अन्य अडचणींमुळे रखडलेल्या महापालिकेतील प्रस्तावित नोकरभरती प्रक्रियेला आता वेग येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यानंतर नाशिक महापालिकेतील नोकरभरती दृष्टिपथात आली आहे. महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला, तरी आस्थापना परिशिष्ट मात्र ‘क’ वर्गाचाच कार्यरत आहे.
14 हजार रिक्त जागा
महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७,०९० पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे 2,८०० हून अधिक पदे दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. गेल्या २१ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरतीच झालेली नाही. ‘ब’ संवर्गानुसार सरकारच्या मान्यतेसाठी सादर केलेल्या १४ हजार पदांच्या सुधारित आकृतिबंधाला सरकारने गेल्या आठ वर्षांत मंजुरी दिलेली नाही.
शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना उपलब्ध साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी ७०४ पदांच्या भरतीला मान्यता दिली होती.
या विभागांची नियमावली मंजूर
नोकरभरतीसाठी महासभेवर प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत), अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्ष प्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती-तंत्रज्ञान अशा अकरा विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलीचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेच्या मंजुरीसाठी सादर केला होता. महासभेच्या मान्यतेनंतर नगरविकास विभागाने ही नियमावली मंजूर केल्यावर महापालिकेत या विभागांमधील नोकरभरतीचा श्रीगणेशा होणार आहे.
‘दारणा’तून थेट वाहिनीचंही ठरलं
नाशिक महापालिकेने शहराची सन २०३६ मधील प्रस्तावित वाढीव लोकसंख्या गृहित धरून पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच सुरू केले आहे. पाणीगळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी गंगापूरपाठोपाठ दारणा धरणातून २५० कोटींच्या थेट जलवाहिनी योजनेस गुरुवारी महासभेने मंजुरी दिली. त्यामुळे नाशिकरोड येथील दूषित पाणीपुरवठ्याचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न निकाली निघणार आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत-२’ अभियानांतर्गत या योजनेसाठी महापालिकेला प्रकल्प खर्चाच्या ५२.८१ टक्के निधी अनुदान स्वरूपात मिळणार असून, उर्वरित १२५ कोटींच्या खर्चाचा भार मात्र पालिकेला उचलावा लागणार आहे.
या प्रस्तावांना मिळाली मंजुरी
- महापालिका रुग्णालयांत स्वयंचलित आग प्रतिबंधक यंत्रणा बसविणार
- मलनिस्सारण योजनेच्या ३२५ कोटींच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब
- पंचवटीतील तरणतलाव दोन वर्षे देखभालीसाठी ठेकेदाराकडे
- अतिरिक्त आयुक्तपदी भाग्यश्री बानायत यांना रुजू करण्यास मंजुरी
- टाकळी, कपिला संगम सांडपाणी पंपिंग स्टेशन तीन वर्षांकरिता खासगी ठेकेदाराकडे अकरा विभागांची सेवाप्रवेश नियमावली महासभेकडून मंजूर झाली आहे.
FAQ (Nashik Mahanagarpalika Bharti)
1.भरती कोणत्या विभागांसाठी होणार आहे?
अग्निशमन, वैद्यकीय, अभियांत्रिकी, सुरक्षा, माहिती-तंत्रज्ञान आदी विभागांसाठी.
2.एकूण किती पदांची भरती होणार आहे?
सुमारे २५०० रिक्त पदांसाठी जम्बो भरती होणार आहे.
3.७०४ पदांची भरती कधी मंजूर झाली?
गतवर्षी ७०४ पदांसाठी भरतीला मान्यता मिळाली होती.
4.महापालिकेतील मंजूर पदांची संख्या किती आहे?
आस्थापना परिशिष्टावर एकूण ७०९० पदे मंजूर आहेत.
5.महापालिकेत नोकरभरती का रखडली होती?
आकृतिबंध, खर्च आणि मंजुरीच्या अडचणींमुळे २१ वर्षांपासून भरती रखडली होती
1 thought on “नाशिक महानगरपालिकेत 14000 रिक्त जागांसाठी भरती !! | Nashik Mahanagarpalika Bharti 2025”