Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी, गट-क व गट-ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरीता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनूसार गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण 300 पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 10/11/2025 पासून ते दिनांक 16/12/2025 रोजी पर्यंत आहे.
इच्छुक उमेदवारांनी www.nmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून ते दिनांक 16 डिसेंबर 2025 या दिवशी रात्री 11.55 वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाचे प दाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
रेल्वेमध्ये 5810 पदांची मोठ्ठी भरती सुरु! ऑनलाईन अर्ज सुरु | Railway Recruitment 2025
पदांचा तपशील
- चालक – यंत्रचालक / वाहनचालक (अग्निशमन) – 36 जागा
- फायरमन (अग्निशामक) – 150 जागा
- अभियंता (विविध श्रेणी) – 114 जागा
शैक्षणिक पात्रता
- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व संबंधित विषयात इंजिनीअरिंगची पदवी उत्तीर्ण आवश्यक
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र. मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशामक पाठयक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य.
- वाहनचालक या पदावर किमान ३ वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक.) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्था येथे किमान ०५ वर्ष काम केल्याचा अनुभव.
- वैध जडवाहन चालविण्यासाठी परवाना असणे आवश्यक
- मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहीणे, वाचणे व बोलणे)
किमान शारीरीक पात्रता
- उंची १६५ से.मी., (महिला उमेदवारांची उंची १५७ से.मी.),
- छाती – साधारण ८१ सें.मी. फुगवून ५ से.मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.)
- वजन – किमान ५० कि. ग्रॅम (पुरुष) व किमान ४६ कि.ग्रॅम (महिला)
- दृष्टी – चांगली
निवड प्रक्रिया
उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाणार आहे सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
अर्ज करण्याचा कालावधी
10 नोव्हेंबर 2025 पासून 16 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
मासिक वेतन (NMC Bharti 2025)
पदानुसार मानधन देण्यात येणार असून कमीत कमी 19000 ते 132300 रुपये मासिक वेतन देण्यात येईल.
जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु;त्वरित अर्ज करा | ZP Bharti 2025
अर्जाचे शुल्क
- खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु.1000/-
- मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु. 900/-
- परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरणा करण्यात यावे.
- उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा
- प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
- परीक्षा शल्क ना परतावा (Non-Refundable) आहे.
अटी व शर्ती
- परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नाशिक
महानगरपालिका www.nmc.gov.in या संकेत स्थळावर माहिती प्रसारित केली जाईल यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी. - ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल www.nmc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
- सदरची परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकुण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांनी राखून ठेवला आहे.
| PDF जाहिरात-1 | PDF जाहिरात-2 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |
FAQ
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती नाशिक महानगरपालिका राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 19000 ते 132,300 रुपये पर्यंत पगार मिळेल.
4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.900/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.1000/-

2 thoughts on “10वी पासवर नाशिक महानगरपालिकेत 300 जागांसाठी बंपर भरती;मुदतवाढ”