Close Visit MahaNews12

NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत 10वी,12वी उत्तीर्णांसाठी 30 जागांवर नोकरीची संधी!!

NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेचा (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025) एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

खाली नमूद केल्याप्रमाणे ठोक मानधनावर ही भरती जाहीर केली असून यासाठी थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे. मुलाखतीला जाण्या अगोदर खाली दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतर जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रता व अटी पूर्ण करत असल्यास 11 सप्टेंबर 2025 रोजी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्र व त्याच्या एक झेरॉक्स प्रतिसह मुलाखतीला हजर राहावे.

पदांचा तपशील

  • वैद्यकीय अधिकारी – 10 जागा
  • स्टाफ नर्स – 07 जागा
  • ए एन एम – 10 जागा
  • औषधनिर्माता – 03 जागा

(सामाजिक आरक्षणानुसार रिक्त जागांचा तपशील पाहण्यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी.) एकूण 30 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

विविध पदांसाठी वेगवेगळी पात्रता दाखविलेली असून कमीत कमी 10वी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील.. शासकीय किंवा खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक राहील. उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षा असावे. राखीव प्रवर्गासाठी हे वय 43 वर्षापर्यंत शथील राहील.

अर्ज भरण्याच्या सूचना (NMMC Bharti 2025)

स्टाफ नर्स, ए.एन.एम. व औषधनिर्माता पदाकरीता पूर्ण भरलेला अर्ज व (त्र) मधील मुद्दा क्र. 5 नुसार सर्व कागदपत्रे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से.15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614 येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात (By Hand) व कुरीअरने दि. 26/08/2025 ते दि. 11/09/2025 पर्यंत सादर करण्यात यावेत.

दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (टपालाने/कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
आवश्यक कागदपत्रे

आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत केलेल्या प्रति अर्जाच्या नमुना सोबत जोडाव्यात, खालील कागदपत्रे अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.

  1. वयाचे पुरावा
  2. शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  3. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  4. शासकीय निवास शासकीय व खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  5. राखीव संवर्गातील उमेदवाराने जात प्रमाणपत्र
  6. अधिवास प्रमाणपत्र
  7. आधार कार्ड
  8. पॅन कार्ड
  9. सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  10. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र
  11. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  12. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र

अर्ज करण्याची पद्धत (NMMC Recruitment 2025)

ही निवड मुलाखती द्वारे होणार असून मुलाखतीला जाताना खाली दिलेल्या नमुन्यातील अर्ज व्यवस्थित रित्या भरायचा आहे आणि त्यानंतर मुलाखतीला आवश्यक कागदपत्रासोबत हजर राहायचे आहे.

मुलाखतीचे ठिकाण व तारीख

ही मुलाखत 10 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येईल ही मुलाखत येईल आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से.15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे उपस्थित राहावे.

मासिक वेतन

या पद्भारतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मासिक वेतन कमीत कमी 17000 रुपये ते 60000 रुपये पर्यंत दिले जाणार आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचू शकता मूळ जाहिरातीमध्ये प्रवर्गानुसार रिक्त जागेचा तपशील इतर महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मुलाखतीला जाण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी आणि त्यानंतर व्यवस्थित अर्ज भरून मुलाखतीला जावे, या मुलाखतीला तुम्हाला स्वखर्चाने जायचं असून कोणताही भत्ता महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Questions)

1.भरती कुठे आहे ?
Ans : हि भरती नवी मुंबई महानगरपालिकेची आहे.

2.निवड कशी होणार आहे?
Ans: येथे मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

3.मुलाखत कधी आहे?
Ans:उद्या 10 सप्टेंबर रोजी मुलाखत घेतली जाईल.

4.मुलाखतीसाठी भत्ता मिलेल का?
Ans: नाही.

5.मुलाखतीसाठी कोणते कागदपत्रे घेऊन जाऊ?
Ans: वर नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत न्यावेत.

Leave a Comment