RTE Admission 2026 : आर टी ई (राईट टू एज्युकेशन ॲक्ट) म्हणजे शिक्षणाचा हक्क हा कायदा 2015 पासून अमलात आला असून सर्वांना चांगले शिक्षण मिळावे असा या कायद्याचा उद्देश आहे. 25 टक्के जागा या कायद्याअंतर्गत राखीव ठेवल्या जातात यामध्ये गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेमध्ये शिकण्याची संधी मिळत असते.
नर्सरी पासून ते आठवीपर्यंत या कायद्याअंतर्गत विद्यार्थी लाभ घेऊ शकतात तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये मराठी मिडीयम मध्ये राज्याच्या बोर्डामध्ये तसेच केंद्रीय बोर्डामध्ये सुद्धा या कायद्याअंतर्गत प्रवेश घेऊ शकता. 2026 मध्ये ही प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे या प्रक्रियेसाठी पहिले शाळेचे नोंदणी होते शाळेची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सुरुवात केली जाते.
दरवर्षी जानेवारी पासून ही नोंदणी सुरू होते तर मार्च पर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडली जाते यासाठी कोणती मुलं पात्र असतात कोणती कागदपत्रा आवश्यक असतात याची माहिती खाली दिलेली आहे व अर्ज कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा माहिती खाली सांगितलेले आहे पालकांनी आतापासूनच सर्व कागदपत्रे तयार करून ठेवण्यास सुरुवात करावी जेणेकरून नोंदणी सुरू झाल्यानंतर कोणत्या अडथळा येणार नाही.
या वर्षी 09 जानेवारीपासून शाळेची नोंदणी सुरु झाली असून 19 27 जानेवारी 2026 पर्यंत हि नोंदणी पूर्ण करायची आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज सुरु केले जातील, जेव्हा ऑनलाईन अर्ज सुरु होतील त्यावेळेस तुम्हाला लगेच अपडेट देण्यात येईल.
नवीन GR आला ! शाळेच्या सुट्ट्याची नवीन यादी जाहीर;उद्या.. | School Holidays List 2026
आवश्यक कागदपत्रे
1) आर.टी.ई. २५ % online प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी online प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
2) बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर.टी.ई. प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत.
आवश्यक कागदपत्रांची यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वयोमर्यादा किती आवश्यक आहे?
- 31 डिसेंबर 2025 रोजी प्ले ग्रुप/नर्सरी साठी 3 वर्षाहून अधिक वय असावे.
- 31 डिसेंबर 2025 रोजी इयत्ता पहिली साठी 6 वर्षाहून अधिक वय असावे.
अर्ज कशा पद्धतीने सादर करावा
प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईटवर वेळोवेळी उपडेट येत आहेत, वेबसाईट वर सध्या 2026-27 च्या प्रवेशाची माहिती जुन्या लॉगिन द्वारे दिसत आहे, पुढच्या आठवड्यात नवीन नोंदणी चालू केल्या जाणार आहे अर्ज प्रक्रिया सुरु होईल त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
- एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही .
- एका बालकाचा एका पेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील. जन्म तारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज Delete करून पुन्हा नवीन अर्ज भरावा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
FAQ
1.आर.टी.ई. कायदा म्हणजे काय?
शिक्षणाचा हक्क कायदा 2015 पासून लागू असून 25% जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.
2.या कायद्याअंतर्गत कोणत्या वर्गात प्रवेश मिळतो?
नर्सरीपासून ते इयत्ता आठवीपर्यंत प्रवेश घेता येतो.
3.अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा व जन्मतारखेचा पुरावा आवश्यक आहे.
4.वयोमर्यादा किती आहे?
31 डिसेंबर 2025 रोजी नर्सरीसाठी किमान 3 वर्षे व इयत्ता पहिलीसाठी किमान 6 वर्षे वय असावे.
5.अर्ज प्रक्रिया कधी व कशी होते?
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया चालते; अर्ज अधिकृत वेबसाईटवर करावा.
6.पालकांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
मूळ कागदपत्रे पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे; चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होईल.

स्कूल लिस्ट मिळेल का.. नर्सरी पासून कल्याण मध्ये कोणते कोणते स्कूल उपलब्ध आहेत.