Close Visit MahaNews12

1773 रिक्त जागा | ठाणे महानगरपालिकेत बंपर भरती | Thane Mahanagarpalika Bharti

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! ठाणे महानगरपालिकेत गट “क” व गट “ड” पदांकरिता मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 12 ऑगस्ट 2025 पासून 2 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील
  • गट “क” व गट “ड”
पदसंख्या
  • गट “क” – 1620
  • गट “ड” – 153
  • एकूण -1773 रिक्त जागा
पगार Thane Municipal Corporation 
  • यामध्ये उमेदवारांना कमीत कमी 15000 जास्तीत जास्त 132300 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असणार आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
नोकरीचे ठिकाण
  • ठाणे, महाराष्ट्र
Thane Mahanagarpalika Bharti 2025 अर्ज शुल्क 
  • मागास प्रवर्ग – 900 रुपये
  • मागास प्रवर्ग – 1000 रुपये

अर्ज पद्धती

  • उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे
अर्ज शुल्क 
  • अमागास वर्ग – 1000/-
  • मागास वर्ग – 900/-
  • माजी सैनिक व दिव्यांगांना कोणत्याही प्रकारच्या अर्ज शुल्क नाही.

अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 

  • 12 ऑगस्ट 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

  • 2 सप्टेंबर 2025

आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड/ओळखपत्र, फोटो आणि सहीचा फोटो
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना 
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करावेत.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकरण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत, उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.
  • एकापेक्षा अधिक पदांसाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र अर्ज शुल्क भरायचे आहे, माजी सैनिक व दिव्यांगांना कोणत्याही प्रकारच्या अर्ज शुल्क नाही.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, पद भरतीचे सर्व अधिकार ठाणे महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहे.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

ही भरती गट “क” व गट “ड” मधील विविध पदांसाठी आहे.

2.शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 सप्टेंबर 2025

3.अर्ज कसा करायचा आहे?

ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे

4.वेतन किती मिळेल?

पदानुसार ₹15,000 ते ₹1,32,300 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

ठाणे, महाराष्ट्र

Leave a Comment