उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी 80 जागांवर नवीन भरती सुरु!! | UMC Bharti 2025

UMC Bharti 2025 : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • सूक्ष्मजीवतज्ज्ञ (मायक्रोबायलॉजिस्ट)
  • वैद्यकिय अधिकारी (पुर्ण वेळ)
  • वैद्यकिय अधिकारी (अर्ध वेळ)
  • फिजिशियन (औषध)
  • प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ
  • बालरोगतज्ज्ञ
  • नेत्रतज्ज्ञ
  • त्वचारोगतज्ज्ञ
  • मानसोपचारतज्ज्ञ
  • ईएनटी तज्ञ

पदसंख्या

  • एकूण – 80 रिक्त जागा

निवड प्रक्रिया

मुलाखतीनुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्ग निहाय गुणांकन यादी (Merit List) तयार करण्यात येणार अंसून त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती आदेश Mail द्वारे निर्गमित करण्यात येतील.

आवश्यक कागदपत्रे

१. पुर्ण माहिती भरलेला फॉर्म
२. वयाचा पुरावा (१० वी गुणपत्रक)
३. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
४. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
५. सद्याचे पासपोर्ट आकाराचे २ फोटो
६. आधारकार्ड
७. पॅनकार्ड
८. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
९. राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
१०. आरक्षणाच्या पदासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
११. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
१२. शासकीय / निमशासकीय/खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र.
१३. MS-CIT प्रमाणपत्र
१४. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
१५. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
१६. अर्ज व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करुन सादर करावे. सदर लिफाफयावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव व पदाचे नाव नमूद करावे, महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून, जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह दिनांक 08/09/2025 ते दिनांक 12/09/2025 रोजी पर्यंत दुपारी 12.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत वैद्यकिय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका येथे थेट मुलाखतीकरिता उपस्थित रहावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग.

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत-कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पगार Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2025 
  • यामध्ये उमेदवारांना पगार कमीत-कमी 30,000 व जास्तीत जास्त 60,000 पर्यंत पदांनुसार देण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • सर्व उमेदवारांनी खालील नमूद फार्म मध्येच अर्ज भरणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणे अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
    माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
  • ज्या उमेदवाराना Grade System or CGPA/SGPA नुसार गुण मिळालेले आहेत त्यांनी अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी तसेच त्यांच्या विद्यापीठानुसार टक्केवारी काढण्याचे सुत्र अर्जामध्ये नमूद करावे. सदर माहिती न दिल्यास गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांका पर्यंत असणारे वय दिवस महिने व वर्ष अचूक नमुद करावे.
  • अर्जात उमेदवारांचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी.अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1.नोकरीचे ठिकाण कोणते आहे?

उत्तर : उल्हासनगर, जिल्हा ठाणे.

2. अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

उत्तर : अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.

3. अर्ज करण्याची तारीख काय आहे?

उत्तर : दिनांक ०८/०९/२०२५ ते दिनांक १२/०९/२०२५

4. अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?

उत्तर : उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग.

5. शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे, त्यामुळे मूळ जाहिरात वाचणे अत्यावश्यक आहे.

2 thoughts on “उल्हासनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी 80 जागांवर नवीन भरती सुरु!! | UMC Bharti 2025”

Leave a Comment