MS-CIT Course 2025 : सर्व शासकीय नोकरीसाठी तसेच खाजगी नोकरीसाठी सुद्धा उपयुक्त असणारा कोर्स म्हणजे एमएस-सीआयटी याद्वारे संगणकाचे बेसिक ज्ञान पुरवल्या जाते. एमएस-सीआयटी सर्टिफिकेशन कोर्स साठी अंदाजे 4500 रुपये एवढी फी तुम्हाला भरावी लागते.
यासाठी अर्ज ऑफलाईन भरू शकतो तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता तुम्हाला एमएस-सीआयटी चे प्रशिक्षण आता सहज पूर्ण करता येणार आहे त्याविषयीची माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत.
MSCIT का आवश्यक आहे?
एमएस-सीआयटी कोर्स सरकारी नोकरी किंवा खाजगी कार्यालयामध्ये काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एमकेसीएलच्या अधिकृत केंद्रावरून तुम्हाला हा कोर्स पूर्ण करावा लागतो हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही संगणक विषयीचे ज्ञान मिळू शकतात सध्या AI चा अभ्यासपण एमएससीआयटी मध्ये घेतला जातो.
तसेच याचे पूर्ण प्रशिक्षण सुद्धा यामध्ये तुम्हाला दिल्या जाते एमएस-सीआयटी चा हा कोर्स तीन महिन्याचा असतो त्यानंतर या कोर्सची परीक्षा घेतली जाते आणि परीक्षा घेऊन तुम्ही पास झाला तर तुम्हाला एमएससीआयटीच्या सर्टिफिकेट दिला जाते.
मोफत एमएससीआयटी कशी करावी?
एमएस-सीआयटी साठी अंदाजे साडेचार हजार रुपये एवढं खर्च येतो या व्यतिरिक्त परीक्षेची शुल्क उमेदवाराला वेगळे भरायचे असतात. परंतु महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे तुम्ही भरलेली पूर्ण फी माफ होऊ शकते व तुम्हाला त्याचे सर्व पैसे परत मिळू शकतात.
यासाठी तुम्ही बांधकाम कामगाराचे पाल्या असणे गरजेचे आहे व त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुद्धा सादर करायचा असतो.
अर्ज करण्यासाठी कागदपत्रे
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र
- बँकेचे पासबुक
- रहिवासी पुरावा
- शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा व इतर आवश्यक असलेले सर्व कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे.
कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला हा अर्ज सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे जमा करायचा आहे आवश्यक सर्व कागदपत्र व्यवस्थित जोडून अर्ज सुद्धा व्यवस्थित भरून योजनेची सविस्तर माहिती तुम्हाला घ्यायची आहे.
योजनेचा अर्ज भरताना व्यवस्थित तारीख, जिल्हा, अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, व इतर आवश्यक आहे ते माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे आणि अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. हा अर्ज भरल्यानंतर या फीची रक्कम तुमच्या अकाउंटला हस्तांतरित केल्या जाईल आणि तुम्ही जे साडेचार हजार रुपये भरून कोर्स करणार होतात ते साडेचार हजार तुम्हाला परत मिळतील म्हणजे हा कोर्स तुम्ही कोणताही पैसा खर्च न करता करू शकणार आहात.
परंतु यासाठी तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सदस्य अथवा पाल्य असणे आवश्यक आहे किंवा स्वतः सदस्य सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे.
शैक्षणिक योजनेसाठी हा लाभ देण्यात येत असून उमेदवाराने अर्जात नमूद असलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित रित्या भरायचे आहेत फोटो लावायचा आहे आणि अर्ज सादर करायचा आहे.
योजनेसाठी अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.एमएससीआयटीचा वापर कुठे होतो?
Ans : एमएससीआयटी कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला संगणकाचे बेसिक ज्ञान मिळते याचा उपयोग तुम्ही खाजगी कार्यालयांमध्ये काम करताना किंवा सरकारी कामांमध्ये करू शकता.
2.अर्ज कसा करायचा आहे?
Ans : हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा असून खाली अर्जाची लिंक तसेच इतर माहिती सुद्धा दिलेली आहे.
3.कधीपर्यंत सादर करू शकतो?
Ans : या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची वैधता दिलेली नसून तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात.
4.अर्ज करण्यासाठी महत्त्वाची अट?
Ans : अर्ज करण्यासाठी सर्वात महत्वाची अट तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सदस्य अथवा सदस्यांचे पाल्य असणे आवश्यक आहे.