ZP Nashik Recruitment 2025 : जिल्हा परिषद नाशिक (ZP Bharti) मार्फत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक यांच्यातर्फे विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
हे अर्ज 22 ऑगस्ट 2025 पूर्वी आहे नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत, अर्ज सादर करण्या अगोदर उमेदवार जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी आणि त्यानंतर पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा.
पदांचा तपशील
- ब्लड बँक कौन्सिलर – 04 जागा
- ब्लड बँक लॅब टेक्निशियन – 03 जागा
शैक्षणिक अर्हता व इतर निकष
ब्लड बँक कौन्सिलर पदासाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त संस्थेमधून पदव्युत्तर पदवी धारण केलेला असावा, उमेदवाराला संगणक चालविण्याचे ज्ञान असावे. एम एस ऑफिस मध्ये योग्यता प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराला कमीत कमीत कमी 02 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
ब्लड बँक लॅब टेक्निशियन या पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये डिग्री किंवा मेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. हा डिप्लोमा बारावीनंतर उमेदवारांनी धारण केलेला असावा या पदासाठी पदव्युत्तर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. एम एस ऑफिस हाताळण्याची गरज आहे आणि कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे.
मासिक वेतन
निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे वेतन दिले जाणार असून ब्लड बँक कौन्सिलर साठी 21000 तर ब्लड बँक लॅब टेक्निशियन साठी 25000 रुपये एवढं मासिक वेतन दिले जाणार आहे.
वयोमर्यादा या पदभरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 60 वर्षे असावे हे वय जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास ग्राह्य धरल्या जाईल जर उमेदवार नाही मिळाल्यास हे वय 62 पर्यंत वाढविले जाऊ शकते.
अर्ज कसा करावा
या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून हा अर्ज जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, (डी.ए.पी.सी.यू.) जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, आउटरिच आर.एम.ओ. ऑफिसच्या बाजूला, रेकॉर्ड रूमच्या वर, त्रंबक रोआ४ गोल्फ क्लब ग्राउंडजवळ४ नाशिक जिल्हा नाशिक पिन कोड ४२२००२ या ठिकाणी सादर करायचा आहे.
निवड प्रक्रिया
वर दिलेल्या पदासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये अर्जाची छाननी करून पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी बोलायले जाईल.
उमेदवारासाठी सूचना
- उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर सविस्तर बातमी वाचून घ्यावी व त्यानंतरच अर्ज सादर करावा.
- पात्रता अनुभव हे तर आवश्यक निकष उमेदवाराकडे असतील तर सादर करावा अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.
- उमेदवारांनी अर्ज A 4 पेपरवर प्रिंट करून सादर करणे गरजेचे आहे.
- उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेदवाराला त्यांच्या ईमेल आयडी घेऊन मोबाईल नंबर वर कळवण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.ही भरती कोणत्या जिल्ह्यात आहे.
Ans : ही भरती नाशिक जिल्ह्यात आहे
2.या पदभरती मध्ये किती पदे भरले जाणार आहेत?
Ans : या पदभरतीमध्ये ब्लड बँक कौन्सिलर ओळख टेक्निशियन या दोन पदाच्या एकूण सात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
3.दोन्ही पदासाठी महत्त्वाची पात्रता काय आहे?
Ans : दोन्ही पदासाठी संगणक हाताळण्याचे ज्ञान आवश्यक राहणार आहे.
4.मुलाखतीसाठी उमेदवाराला भत्ता मिळेल आहे का नाही?
Ans : उमेदवाराला स्वखर्चाने मुलाखतीला किंवा परीक्षेला जायचे आहे.
5.अर्ज कसा सादर करायचा?
Ans : अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा असून विहित नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे.