जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव मध्ये नोकरीची संधी त्वरित अर्ज करा | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे व त्याचे अ‌द्यावतीकरण, विचार विनियम कार्यशाळा आयोजित करणे आराखड्याची व्यवहार्यता तपासणे, रंगीत तालीम घेणे, आपत्ती व्यवस्थापनासंबंधी विभागाचे आराखडे तयार करणे.

तसेच नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपती येण्यापूर्वी, आपत्ती सुरू असतांना व आपत्तीनंतर करावयाच्या उपाययोजना बावत सनियागा करणे आणि संस्थात्मक मजबुतीकरण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मजबुतीकरण, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत संस्थाचे कार्य करणे हे कामे असतील.

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  1. मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी पब्लिक पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक
  2. उमेदवाराला मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे
  3. शासकीय कामाच्या अनुभवास विशेष प्राधान्य देण्यात येईल
  4. वयोमर्यादा : यामध्ये उमेदवार जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असावी

आवश्यक कागदपत्रे

  • किमान शैक्षणिक अर्हता व त्यावरील शैक्षणिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला /जन्म दाखला
  • तीन वर्षाचा अनुभव त्यातील किमान दोन वर्ष अनुभव आपत्ती व्यवस्थापनातील असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • प्रकल्प हाताळण्याचा पूर्वानुभव असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
  • महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र
  • लहान कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.

पदांचे नाव (Collector Office Bharti 2025)

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

नोकरीचे ठिकाण

धाराशिव, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज 04 सप्टेंबर 2025 पूर्वी पोहचतील अश्या बेताने नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

04 सप्टेंबर 2025 पूर्वी आवक जावक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, मेन रोड, धाराशिव, पिनकोड-413501 या ठिकाणी जाहिरातीमधील दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.

पगार

या पदभरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 75000 रुपये मानधन देण्यात येईल याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी सूचना (Jilhadhikari Karyalay Bharti 2025)

  • जाहिरातीपुर्वी व जाहिरातीमध्ये दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त तसेच अपुर्ण, अर्धवटरित्या भरलेले, चुकीचे भरलेले अर्ज वा काही त्रुटी आढळून आल्यास अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • अर्ज केला अथवा विहित अहेता धारण केली म्हणजे मुलाखतीचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
    भरती प्रक्रिये संदर्भात न्यायालयीन दाव्याचे कार्यक्षेत्र धाराशिव राहील.
  • निवड झालेल्या उमेदवारास कामावर रुजू होणेबाबत या कार्यालयाचे संकेतस्थळ www.dharashiv.maharashtra.gov.in वर पसि‌‌द्धीपत्रका‌द्वारे/ई-मेल‌द्वारे कळविण्यात येईल. तसेच विहीत नमुन्यातील करारनामा नियुक्तीनंतर सात दिवसाचे आत रु. 500/- चे बॉन्डवर करुन देणे बंधनकारक राहील.
  • एक अथवा सर्व अर्ज नाकारण्याचा, निवड प्रक्रियेत वेळेवर होणारा बदल तसेच अंतिम निर्णय इत्यादी बाबनचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती यांनी राखुन ठेवले आहेत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1.भरती कोणासाठी आहे?
ही भरती “जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी” पदासाठी आहे. आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान व आपत्तीनंतरच्या उपाययोजना, आराखडे तयार करणे, कार्यशाळा आयोजित करणे, संस्थात्मक मजबुतीकरण इत्यादी जबाबदाऱ्या असतील.

2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी व सार्वजनिक प्रशासनातील पदव्युत्तर पदवी आवश्यक.

3.वयोमर्यादा काय आहे?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 38 वर्ष असावे.

4.अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

5.अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?

आवक जावक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, मेन रोड, धाराशिव, पिनकोड-413501

Leave a Comment