MBMC Recruitment 2025 : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट “क” मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याकरिता मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे ही प्रशासकीय सेवा, लेखासेवा, लेखा परीक्षण सेवा, अभियांत्रिकी सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, उद्यान सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील असणार आहेत.
या भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर जाहिरातीनुसार गट “क” संवर्गातील एकूण 358 पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज पदानुसार आवश्यकता सर्व कागदपत्रांसह 22 ऑगस्ट 2025 पासून ते 12 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.
पदसंख्या (Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti)
- एकूण – 358 रिक्त जागा
पदांचा तपशील
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/मेकॅनिकल/विद्युत)
- लिपिक टंकलेखक
- सर्वेअर
- नळकारागीर
- फिटर
- मिस्त्री
- पंपचालक
- अनुरेखक
- वीजतंत्री
- कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर
- स्वच्छता निरीक्षक
- चालक
- यंत्रचालक
- सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी
- अग्निशामक
- उद्यान निरीक्षक
- लेखापाल
- डायलिसिस तंत्रज्ञ
- बालवाडी शिक्षिका
- परिचारिका/प्रसविका
- औषध निर्माता
- लेखापरीक्षक
- सहाय्यक विधी अधिकारी
- तारतंत्री
- ग्रंथपाल
अर्ज पद्धती
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
पगार MBMC Recruitment 2025
- उमेदवारांना पगार हा पदानुसार जास्तीत जास्त एक लाखापर्यंत देण्यात येणार आहे.
सुरुवातीची तारीख
- 22 ऑगस्ट 2025
शेवटची तारीख
- 12 नोव्हेंबर 2025
अर्ज शुल्क Mira Bhaindar Municipal Corporation
- खुला प्रवर्ग – 1000 रुपये
- मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग – 900 रुपये
- माजी सैनिक – कोणतेही अर्ज शुल्क नाही
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र इत्यादी बाबी प्रवेश पत्रामध्ये नमूद केल्या जातील, संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरणे आवश्यक आहे, उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
- परीक्षा शुल्क ना परतावा आहे, ऑनलाइन शुल्क भरताना बँकेचे इतर शिल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील ,कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित/ रद्द झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही.
- ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, तपशील तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
- पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी इत्यादी बाबतचा तपशील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत स्थळावर देखील उपलब्ध करण्यात आलेला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. ही भरती कोणासाठी आहे?
ही भरती गट “क” मधील विविध पदांसाठी आहे, जसे की कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशामक, परिचारिका, शिक्षक, लेखापाल, ड्रायव्हर, तंत्रज्ञ इत्यादी.
2. एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
एकूण 358 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
3. अर्ज कधीपासून करता येईल?
22 ऑगस्ट 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
4. अंतिम तारीख कोणती?
अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2025 आहे.
5.अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागेल.