MSF Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे. (MSSC Recruitment 2025) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून वेगवेगळया आस्थापनांना पुरविण्यात येणाऱ्या / आलेल्या सुरक्षा कर्मीवर पर्यवेक्षण व इतर कामासाठी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) आणि पोलीस निरीक्षक (PI) दर्जाचे अधिकारी यांना अनुक्रमे सह संचालक (Jt. Director) आणि सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी (SSO) या पदावर निवड करणे; याकरीता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांचा तपशील
- सह संचालक – 01 जागा
- सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक अर्हता,वेतन व इतर निकष
- सह संचालक : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण व नागपूर शहर किंवा विदर्भातील रहिवाशी असलेले व त्या विभागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल.मासिक वेतन 57000 रुपये दिले जाईल.
- सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आणि पदांसाठी त्या-त्या भागात राहत असलेले व त्याभागात पोलीस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल. मासिक वेतन 45000 रुपये दिले जाईल.
अर्ज सादर करण्याची पध्दत व कालावधी (MSSC Recruitment 2025)
20 ऑगस्ट ते 03 सप्टेंबर 2025 दरम्यान इच्छुक व पात्र उमेदवार यांनी यासोबतच्या विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळास खालील पत्यावर प्रत्यक्ष हजर राहून किंवा पोस्टाने पाठविण्यात यावेत.
अर्ज सादर करण्याचा मुलाखतीचा पत्ता
पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५ दूरध्वनी : (०२२) ६९९६५५५५.
मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :-
१. वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
२. शैक्षणिक कागदपत्रे
३. सेवानिवृत्त प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
४. निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
५. फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड
६. मागील पाच वर्षाचे ACR
इतर महत्वाच्या सुचना (MSF Bharti 2025)
- इच्छुक अर्जधारक यांना मुलाखतीपूर्वी महामंडळाबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी महामंडळाचे संकेतस्थळ https://mahasecurity.gov.in यावर भेट द्यावी.
- उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज / BIO-DATA पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करावेत.
- उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात येईल.
- मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
- मुलाखतीसाठी येताना सेवानिवृत्ती ओळखपत्र, पेन्शन पुस्तिका व शैक्षणिक अर्हता विषयक सर्व कागदपत्राच्या मुळ प्रती, BIO-DATA व त्याच्या ०२ छायांकित प्रती आणाव्यात.
- मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या
- सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
- निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1 : कोणती पदे उपलब्ध आहेत?
उत्तर : सह संचालक (1) व सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी (8).
प्रश्न 2 : शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर :कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक.
प्रश्न 3 : वेतन किती आहे?
उत्तर :सह संचालक ₹57,000, SSO ₹45,000 मासिक.
प्रश्न 4 : अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
उत्तर :03 सप्टेंबर 2025.
प्रश्न 5 : अर्ज कसा करायचा?
उत्तर :पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात.