Close Visit MahaNews12

जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे 16 रिक्त जागांसाठी भरती सुरु!! | ZP Ahilyanagar Bharti 2025

ZP Ahilyanagar Bharti 2025 : उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), अहिल्यानगर अंतर्गत कोपरगाव, पाथर्डी, नगर आणि शेवगाव तालुक्यातील एकात्मिक शेती विकास प्रकल्पाच्या अंतर्गत IFC BLOCK ANCHOR प्रती तालुका 01 पद याप्रमाणे एकूण 04 पदे आणि Senior CRP (वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती) कोपरगाव, पाथर्डी, नगर आणि शेवगाव प्रती तालुका 03 याप्रमाणे12 पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील

  • IFC ब्लॉक अँकर – 04 जागा
  • वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती – 12 जागा

शैक्षणिक अर्हता व इतर निकष

IFC ब्लॉक अँकर : किमान कृषि व कृषि संलग्न पदवी जसे की कृषि तंत्रज्ञान, Bachelor of Science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B. Tech. in Agriculture or Bachelor of Science in Fishery. Bachelor of Science in Forestry, Bachelor of Veterinary Science and Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration पदवी धारक असणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ति पदवीधारक असल्यास १ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय- कमाल वय 43 वर्ष असावे आणि कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, पशुपालन, मधमाशी पालन इत्यादी क्षेत्रातील शेती व शेती आधारित उपक्रम याबाबत माहिती असली पाहिजे. उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. समुदायाला सुलभ रीतीने समजावून सांगता येणे आवश्यक.

वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती : किमान 12 वी पास किंवा जिथे 12 वी पास नसतील तिथे स्थानिक परिस्थिती नुसार अट शिथील करण्याचे अधिकार समितीस राहतील.उमेद अभियानात किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक.
(उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कृषीसखी, पशुसखी, उदयोग सखी, वनसखी इ. पदावर किमान 3 वर्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक)

निवडीचे निकष : समुदाय संसाधन व्यक्ती हि कार्यक्षत्रात उपजीविका सखी उदा. कृषीसखी, पशुसखी, M-CRP (कृषी) उदयोगसखी, वनसखी इ. मध्ये कार्य करणारी असावी व अभियानात समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून काम केल्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा व त्यानुसार प्राधान्यक्रम राहील.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने दिनांक 08 सप्टेंबर 2025 पूर्वी जाहिराती मधील विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

निवड प्रक्रीयेमधील अटी व शर्ती

सदर भरती प्रक्रिया मधील अटी व शर्ती प्रमाणे पद कमी अथवा जास्त अथवा बदल करण्याचे अधिकार निवड समितीस राखून ठेवण्यात आलेले आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास त्याचे निराकरण करण्याचे अधिकार सर्वस्वी निवड समितीकडे राखून ठेवण्यात आले आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1 : ही भरती कोणत्या योजनेअंतर्गत आहे?
उत्तर : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत.

प्रश्न 2 : कोणत्या तालुक्यांमध्ये भरती आहे?
उत्तर : कोपरगाव, पाथर्डी, नगर आणि शेवगाव तालुक्यांमध्ये

प्रश्न 3 : अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
उत्तर : ८ सप्टेंबर २०२५ पूर्वी अर्ज सादर करावा.

प्रश्न 4 : निवड प्रक्रियेत कोणते निकष आहेत?
उत्तर : अनुभव, कार्यक्षेत्रातील कामगिरी आणि प्राधान्यक्रमानुसार निवड.

Leave a Comment