नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या 34 जागांसाठी भरती सुरु!! | Nashik Mahanagarpalika Jobs 2025

Nashik Mahanagarpalika Jobs 2025 : नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत खालील पदे भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. किमान शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह जाहिरात वरील विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करुन व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला हजर रहायचे आहे.मुलाखतीला जाताना मुळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत. मुळ प्रमाणपत्रांची खात्री करुनच अर्ज दाखल करता येईल अन्यथा दाखल करुन घेतला जाणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत पदवी अथवा पद्युत्तर उत्तीर्ण असावा व संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. सदर पदांकरिता किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 60 वर्षापर्यंत राहील याची नोंद घ्यावी.

अर्जाचे शुल्क

अर्जदाराने निवडलेल्या पदांच्या प्रमाणात शुल्काचा भरणा करावा.
1. उमदेवारास राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफट) जोडणे बंधनकारक राहील. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.750/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.500/- रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्ज शुल्क राहील.
॥. धनाकर्ष पुढील नावे काढा.
NASHIK MUNICIPAL CORPORATION INTEGRETED HEALTH & FAMILY WELFARE SOCIETY”
III. वैध धनाकर्षाशिवाय प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
IV. एकापेक्षा अधिक कंत्राटी पदाकरीता अर्ज करीत असल्यास प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र धनाकर्ष जोडावा.
V. अर्ज शुल्कना परतावा (Non- Refundable) आहे.

निवड प्रक्रिया

पात्रतेसाठी एकुण 100 गुण असतील व त्यांची विभागणी अंतिम वर्षाचे गुण, संबधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता, संबंधीत पदाशी निगडीत अनुभव या प्रमाणे असेल.

थेट मुलाखत ठिकाण

राष्ट्रिय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक

थेट मुलाखत दिनांक व वेळ

दर महिन्याच्या दुसया व चौथ्या बुधवारी सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या वेळेत रिक्त पदे पुर्णपणे नियुक्त होईपर्यत आयोजीत करण्यात येत असुन वर नमुद केल्याप्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे. (शासकिय सुटटया वगळून)

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदाचे नाव व तपशील

वैद्यकीय अधिकारी – 34 जागा

मासिक वेतन (NMMC Bharti 2025)

निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 75,000 रुपये एवढे मासिक वेतन असेल.

अर्जाच्या शुल्कव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये किंवा कोणी नोकरी मिळवून देतो म्हणून पैसे उकळत असेल तर अश्या भूलथापांना बाली पडू नये. या भरती विषयीची अधिक माहिती https://nmc.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तपासू शकता.

अटी व शर्ती
  1. उपलब्ध करुन देण्यात येणा-या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवारांनी भरणे आवश्यक आहे.
  2. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, 15 वा वित्त् आयोग हे स्वतंत्र अभियान आहेत. त्यामुळे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये कार्यरत कर्मचा-यांना देय असलेल्या सेवा व लाभ इतर अभियानामध्ये निवड झालेल्या कंत्राटी कर्मचा-यांना मिळणार नाहीत.
  3. केंद्र शासनाच्या मंजूरी नुसार कार्यक्रमांतर्गत अथवा अभियान अंतर्गत बदल झाल्यास परिस्थिती अनुरूप पदांची संख्या/आरक्षणात बदल होऊ शकतो.
  4. जाहीरातीत नमुद केलेल्या पदांची थेट मुलाखत हि दर महिन्याच्या दुसया व चौथ्या बुधवारी सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या वेळेत रिक्त पदे पुर्णपणे नियुक्त होईपर्यत आयोजीत करण्यात येत असुन वर नमुद केल्याप्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे.
  5. सदर कंत्राटी पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी nmc.gov.in या संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती नाशिक महानगरपालिका राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 75000 रुपये पर्यंत पगार मिळेल.

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.750/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.500/-

Leave a Comment