कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 84 जागांसाठी भरती सुरु! | KDMC Recruitment 2025

KDMC Recruitment 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत (Kalyan Dombivli Municipal Corporation) विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील व रिक्त जागा

वैद्यकीय अधिकारी (पुर्णवळ तसेच अर्धवेळ), बालरोग तज्ञ, एपिडेमिओलॉलिस्ट, क्वालिटी अॅस्युरन्स प्रोग्राम को. ऑर्डनिटर आणि पॉलिक्लिनीकरीता तज्ञ सेवा देणारे विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी – 84 जागा

शैक्षणिक पात्रता व निकष

मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदानुसार वेगवेगळी पात्रता दर्शवलेली असून सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची पद्धत

पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

मुलाखतीची तारीख

थेट मुलाखत होणार असून हि मुलाखत दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

मासिक वेतन

निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 18000 ते 75000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अधिकृत संकेतस्थळ : https://www.kdmc.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (KDMC Recruitment 2025)

  1. उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव, ठळक अक्षरात मराठी मधे माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
  2. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.
  3. जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमुद करावे.
  4. अर्जात उमेदवाराची इतर माहिती देखील पूर्ण व अचूक भरणे आवश्यक आहे. उदा. लिंग, प्रवर्ग, जात, नोदणी क्रमांक असल्यास इत्यादी बाबतची माहिती नमूद करावी.
  5. अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसेब नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत करणे आवश्यक आहे.
  6. अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःच्या वैध ई-मेल आयडी/पर्याय ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा कमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा कमांक नमूद करणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पदभरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत चालू ई-मेल व संकेतस्थळावरील माहिती वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  7. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास आहे किंवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे. असल्यास त्याबाबतचे विहित प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
  8. उमेदवाराने आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध वैद्यकीय व तांत्रिक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

2.एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
एकूण 84 पदांसाठी भरती होणार आहे.

3.पदांची नावे कोणती आहेत?
वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, एपिडेमिओलॉजिस्ट, क्वालिटी अॅश्युरन्स को-ऑर्डिनेटर इत्यादी.

4.शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे.

5.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह सादर करायचा आहे.

Leave a Comment