ZP Pune Bharti 2025 : जिल्हा परिषदेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी !! राष्ट्रीय आयुष अभियान व जिल्हा आरोग्य सोसायटीमार्फत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात सादर करायचा आहे.
पदांचा तपशील
- डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेली असावी.
- पदवीधर उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल तसेच उमेदवाराला मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट स्पीड असणे आवश्यक.
- एम एस सी आय टी (MSCIT) किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
हे हि वाचा 👉👉 12वी पासवर जिल्हा परिषदेत “डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदासाठी नोकरीची संधी | ZP DEO Bharti 2025👈👈
पगार (ZP Pune Bharti 2025)
- यामध्ये उमेदवारांना मासिक मानधन हे 18000 रुपये देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख
- इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने दिनांक 01 ऑक्टोबर 2025 पूर्वी जाहिराती मधील विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
हे हि वाचा 👉👉 PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 2000 रूपये बँक खात्यावर जमा! 👈👈
उमेदवारांसाठी सूचना
- भरती प्रक्रिया स्थगित करणे / रद्द करणे / पदभरती प्रक्रियेत बदल करण्याचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेस्तरावर राखिव ठेवण्यात आलेले आहेत, याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही.
- उमेदवाराने विहीत नमुन्यातील अर्ज, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायांकीत सत्यप्रतींसह आपले अर्ज प्रत्यक्ष करायचे आहेत.
- सदर भरतीची प्रक्रिया पुर्ण झालेनंतर भविष्यात जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिलेमुळे जागा रिक्त झालेस प्रतिक्षा यादीतील मेरिटमधील पुढील उमेदवारास नविन भरती प्रक्रिया न करता नियुक्ती आदेश दिले जातील.
- सदर पदाकरिता र. रु ५००/- चा राष्ट्रीयीकृत बँकेचा धनाकर्ष (Demand Draft) सोबतच्या अर्जासोबत सादर करावा. सदर धनाकर्ष District Integrated Health & Family Welfare Society, Pune या नावाने असावा आणि अर्जावर एकदम वरच्या बाजूस जोडण्यात यावा. डिमांड ड्राफ्टच्या नावामध्ये, तारखेमध्ये चूक आढळल्यास अथवा खराब असल्यास संबधित उमेदवाराचा अर्ज पद भरतीच्या पुढील प्रक्रिये करिता ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ
प्रश्न 1: या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेली असावी. मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक आहे. MSCIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
प्रश्न 2: या पदासाठी किती पगार मिळेल?
उत्तर: मासिक मानधन ₹18000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
प्रश्न 3: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज विहित नमुन्यात भरून ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
प्रश्न 4: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 01 ऑक्टोबर 2025 असून सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत अर्ज समक्ष किंवा पोस्टाने स्वीकारले जातील. सुट्टीचे दिवस वगळून.
प्रश्न 5: अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवावेत?
उत्तर: आवक जावक कक्ष, जिल्हा आयुष रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आवार औंध, पुणे येथे कार्यालयीन वेळेत संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत (शासकिय सुट्टी वगळून) पाठवावेत.
1 thought on “जिल्हा परिषद पुणे येथे “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांसाठी भरती सुरु | ZP Pune Bharti 2025”