मोठी बातमी! अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 31,628 कोटींचे पॅकेज जाहीर,कोणाला किती मिळणार

Ativrushti Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर केलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 07 ऑक्टोबर 2025 ला याविषयीची सविस्तर माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटीचा भव्य मदत पॅकेज जाहीर झालेले आहे, खरडून गेलेल्या जमिनीसाठी, कोरडवाहू शेतीसाठी, हंगामी बागायती शेतीसाठी तसेच बागायती शेतीसाठी आणि विहिरीत गाळ साचलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठी रक्कम मिळणार आहे. दुधाळ जनावरासाठी, ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी, कुक्कुटपालन करणाऱ्यांना सुद्धा इथं मदत दिली जाणार आहेत.

आज शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जाणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात मोठा हे मदत पॅकेज असणार आहे किती मदत मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे ते तुम्ही खाली जाणून घेऊ शकतात. हेकटरी जी मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्याविषयीची माहिती तुम्ही खाली पाहू शकता.

ऐतिहासिक पॅकेज जाहीर

महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत पॅकेजच्या माध्यमातून मोठा आधार दिला आहे. अतिवृष्टीने बाधित भागातील शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे मदत पॅकेज आहे.

किती नुकसान भरपाई मिळणार?

यात खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी ३.५ लाख रुपये, कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी १८५०० रुपये, हंगामी बागायती शेतीसाठी हेक्टरी २७००० रुपये, बागायती शेतीसाठी हेक्टरी ३२५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासोबतच, विहिरीत गाळ साचलेल्या, जनावरांची हानी झालेल्या शेतकऱ्यांनाही महायुती सरकारने भव्य मदत जाहीर केली आहे. शेतीची मोडलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असणारच आहे.

तत्पूर्वी हे मदत पॅकेज शेतकऱ्यांना निश्चितच आत्मविश्वास देणारे ठरेल हा मला विश्वास आहे. हि अधिकृत माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेली आहे आणि तसा निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1975514674843295971?t=YLwx3iyX_Q4cvHUv0-c_9w&s=08

FAQ

1.एकूण मदत किती?
महाराष्ट्र शासनाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत ₹३१,६२८ कोटींचे ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केले आहे

2.ही मदत कोणासाठी आहे?
ही मदत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे

3.ही मदत कधीपासून लागू आहे?
७ ऑक्टोबर २०२५ पासून मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार ही मदत लागू झाली आहे

4.अर्ज कसा करायचा?
शासनाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा स्थानिक कृषी कार्यालयात अर्ज करता येईल. लवकरच अर्ज प्रक्रिया जाहीर होईल

Leave a Comment