फक्त 2500 रुपयांत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवा;९५% अनुदान,GR आला | Solar Rooftop yojana 2025

Solar Rooftop yojana 2025 : महाराष्ट्र शासन, केंद्र शासन व महावितरण मार्फत सोलर रूफटॉप ची नवीन योजना लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये जवळपास 95% अनुदान लाभार्थ्यांना मिळणार असून कमीत कमी 2500 रुपये मध्ये सुद्धा सोलर पॅनल तुम्ही छतावर बसू शकणार आहात. याविषयीची माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वेगवेगळे निकष आहेत आणि पात्रता सुद्धा वेगवेगळ्या आहेत. कोणत्या लाभार्थ्यांना किती पैसे भरायचे आहेत आणि कोण या योजनेसाठी पात्र असेल त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे.

लाभार्थ्यांचे निकष

  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याकडे महावितरणचे वैध कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांनी या अगोदर कोणत्याही सोलर रूफटॉप योजनेच्या अनुदानाचा लाभ घेतलेल्या नसावा.
  • अर्जदाराने राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याकडे कोणती थकबाकी नसावी म्हणजे लाभार्थ्याने आतापर्यंतचे सर्व वीज बिल भरलेले असावे.

सोलर रुफटॉप योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

कोणाला किती लाभ मिळेल?

  1. दारिद्र्य रेषेखालील उमेदवाराला फक्त 2500 रुपये भरायचे असून उर्वरित रक्कम राज्य शासन व केंद्रशासन भरणार आहे तर 100 युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा यामध्ये लाभ दिला जाणार आहे.
  2. यामध्ये सर्वसामान्य संवर्गातील लाभार्थ्यांना 10 हजार रुपये भरायचे आहेत व इतर खर्च राज्य शासन व केंद्र शासन करणार आहे तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 5000 रुपये भरायचे आहेत व इतर खर्च राज्य शासन व केंद्र शासन करणार आहे.

या योजनेत अधिकतम लाभ हा पन्नास हजार रुपये एवढा गृहीत धरण्यात आलेला आहे.

अर्ज कसा करावा

यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून खाली अर्ज ची लिंक दिलेली आहे आत्ताच अर्ज चालू झाले नसून अर्ज चालू झाल्यानंतर त्याविषयीचे अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवर व ब्लॉगवर देण्यात येईल.

सोलर रुफटॉप योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

FAQ

1.ही योजना कोण राबवत आहे?
महाराष्ट्र शासन, केंद्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जात आहे.

2.योजनेत किती टक्के अनुदान मिळते?
लाभार्थ्यांना जवळपास 95% पर्यंत अनुदान मिळते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

3.कमीत कमी किती रकमेत सोलर पॅनल बसवता येतो?
फक्त ₹2500 मध्ये सुद्धा सोलर पॅनल बसवता येतो.

4.योजनेसाठी पात्रता काय आहे?
महावितरणचे वैध कनेक्शन, वीज बिलाची थकबाकी नसणे, आणि राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.

5.पूर्वी सोलर योजनेचा लाभ घेतलेल्यांना ही योजना लागू आहे का?
नाही, पूर्वी सोलर योजनेचा लाभ घेतलेल्यांना ही योजना लागू नाही

Leave a Comment