महाराष्ट्राच्या भूमि अभिलेख विभागात लिपिक पदांच्या 903 जागांसाठी भरती जाहीर

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या खाली दिलेल्या संकेतस्थळ वर जाऊन दिनांक 1 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

भरती प्रक्रिये संदर्भातील सर्व कार्यक्रम व सूचना विभागाच्या वरील संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. भरती प्रक्रिये संदर्भातील निर्णयाचे सर्व अधिकार जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म. राज्य), पुणे यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम राहील.

विभागानुसार रिक्त पदे आणि पदसंख्या 

पदाचे नावविभागपद संख्या
भूकरमापकपुणे प्रदेश83
कोकण प्रदेश, मुंबई259
नाशिक प्रदेश124
छ. संभाजीनगर प्रदेश210
अमरावती प्रदेश117
नागपूर प्रदेश110
एकूण पदसंख्या903

 

शैक्षणिक पात्रता

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [प्रवर्गानुसार वयामध्ये सूट देण्यात आली असून त्याच्या माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी]

परीक्षा शुल्क

जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अमागास प्रवर्गास ₹1000/- तर मागास प्रवर्गास ₹900/- आकारण्यात आले आहे.

पगार

निवड झालेल्या उमेदवाराला रु 19900/- ते 63200/- एवढे मासिक वेतन देण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरी ठिकाण

हि भरती संपूर्ण महाराष्ट्रातील विविध विभागात राहणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावेत.

अर्ज करण्याचा व परीक्षेचा कालावधी

दिनांक 01 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत तर परीक्षा 13 & 14 नोव्हेंबर 2025 रोजी घेतल्या जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळhttps://mahabhumi.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लीक करा

 

FAQ

1.ही भरती कोणत्या विभागासाठी आहे?
ही भरती महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागातील गट-क पदसमुह ४ (भूकरमापक) संवर्गासाठी आहे.

2.एकूण किती रिक्त पदे आहेत?
एकूण ९०३ पदे खालीलप्रमाणे विभागनिहाय उपलब्ध आहेत.

3.परीक्षा कधी होणार?
परीक्षा दिनांक: १३ व १४ नोव्हेंबर २०२५

4.निवड झाल्यावर पगार किती मिळेल?
मासिक वेतन ₹19,900/- ते ₹63,200/- पर्यंत मिळेल.

5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
संपूर्ण महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये नियुक्ती होईल

Leave a Comment