BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 69 रिक्त जागांसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांवर भरतीची पुन्हा नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
पदाचा तपशील
- वरिष्ठ सल्लागार
- नेफ्रोलॉजिस्ट
- रक्त संक्रमण अधिकारी
- मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट
- भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी)
- कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ
- दूरध्वनी चालक
- डेटा एंट्री ऑपरेटर
- क्ष-किरण सहाय्यक
- प्रयोगशाळा सहाय्यक
- व्ही. सी. तंत्रज्ञ (E.C.G.)
- ए.आर.सी सल्लागार & ऑर्थोटिक तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळी असल्याने उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी उमेदवार कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे.
हे हि वाचा : 👉👉कॅनरा बँकेत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ; तब्बल 3500 जागांसाठी भरती 👈👈
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्ष असणे गरजेचे आहे.
नोकरीचे ठिकाण
- मुंबई
मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)
- यामध्ये उमेदवाराला कमीत कमी 16000 ते जास्तीत जास्त 20000 रुपये वेतन देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज 01 ऑक्टोबर 2025 ते 10 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 05:30 पर्यंत. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
अर्ज शुल्क
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला 933 (जीएसटी सह) रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.
हे हि वाचा : 👉👉कॅनरा बँकेत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ; तब्बल 3500 जागांसाठी भरती 👈👈
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात.
सर्वसाधारण अटी व सूचना
- उमेदवारांनी अर्जाचे शुल्क कॉलेज इमारत, पहिला मजला, महसूल विभाग (रूम नंबर 112) येथे रुपये 790+18% जीएसटी (रुपये 143) एकूण 933 इतके शुल्क 01 ऑक्टोबर 2025 ते 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत (शनिवार तसेच रविवार वगळून) सकाळी 11.00 ते दुपारी 03:00वाजेपर्यंत भरून त्याची मूळ पावती अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे.
- विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे, की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता पूर्ण करत असून सदर कंत्राटी पदाकरिता ते पात्र आहेत.
- निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार असल्याने मुलाखतीचे ठिकाण व दिनांक व वेळ रुग्णालयाच्या सूचनाफलकावर लावण्यात येईल किंवा दूरध्वनी अथवा ईमेलद्वारे कळविण्यात येईल.
- सदर नेमणूक नियमित स्वरूपाची नसल्यामुळे काही अपरिहार्य परिस्थिती उद्भवल्यास कुठलही कारण न देता भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाकडे आहेत.
- पत्रव्यवहाराकरता उमेदवाराने आपला घरचा पत्ता पिनकोड सहित अर्जात पूर्ण भरावा तसेच संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी नमूद करावेत.
- उमेदवारास मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल, निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांनी चुकीची माहिती /प्रमाणपत्रे/ कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकारण्यात येतील
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
3.पगार किती मिळेल?
Ans : कमीत कमी 16000 ते जास्तीत जास्त 20000 रुपये वेतन देण्यात येईल.
4.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.