12वी पासवर बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; पगार 20000 मिळणार | BMC Recruitment 2025

BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयाकरिता विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिकेमध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. कमीत कमी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतील त्यासाठीच्या अटी व इतर पात्रता उमेदवाराने वाचायच्या आहेत आणि त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.

पदाचा तपशील

डायलिसिस तंत्रज्ञ – 12 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये बीएससी केलेली असावी किंवा उमेदवार हा मान्यता प्राप्त संस्थेतून 12वी पास असावा व एकवर्षाचा किंवा सहा महिन्याचा डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये कोर्स केलेला असण आवश्यक आहे.
  • उमेदवार पन्नास गुणाची मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारा जवळ एमएससीआयटी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे जर नियुक्तीच्या वेळी उमेदवारा जवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास त्याने एमएस-सीआयटी परीक्षा नेमकी च्या तारखेपासून एका वर्षाच्या उत्तीर्ण होऊन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • उमेदवाराचे वय जाहिरात परिषदेच्या दिवशी कमीत कमी 18 वर्षे जास्त 38 वर्ष असावे त्यापेक्षा जास्त असू नये.

निवडीचे निकष (BMC Bharti 2025)

सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीमधून प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे उमेदवारीची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून 05 ऑगस्ट 2025 ते 13 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत. उमेदवारांनी जाहिरातीमधील अर्जाचा नमुना व्यवस्थितरित्या भरून आवश्यक असलेल्या सर्व शैक्षणिक कागदपत्र जोडून लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात 13 ऑगस्ट 2025 संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सादर करावे.

अर्जाचे शुल्क

वर नमूद केलेल्या पदांसाठी अर्जाचे शुल्क लोटीमस रुग्णालय कॉलेज इमारत, तळमजला, रोखपाल विभाग (रूम नंबर 15) येथे 790 रुपये व जीएसटी 143 रुपये असे एकूण 933 रुपये शुल्क 13 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भरून त्याची मूळ पावती घ्यावी व अर्ज सादर करते वेळेस मूळ पावती, शैक्षणिक कागदपत्र व अर्ज सादर करावा.

सर्वसाधारण अटी व सूचना

  • उमेदवाराचा भ्रमणध्वनी क्रमांक ई-मेल आयडी आणि पत्र व्यवहाराचा पत्ता पिन कोड स्पष्ट व पूर्ण असावा.
  • पात्र उमेदवारांना कंत्राटी नियुक्ती देण्यापूर्वी सन्माननीय पोलिस ठाण्याकडून उमेदवाराचे चारित्र व पूर्व चरित्र प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. उमेदवारला कोणतेहि न्यायालय, नैतिक अधःपतन किंवा फौजदारी स्वरूपाच्या शिक्षा दिली असल्यास तसेच उमेदवाराविरुद्ध पोलीस चौकशी न्यायालय प्रकरण प्रलंबित असल्यास त्याची माहिती उमेदवाराने द्यावी.
  • मुलाखती स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहायचे आहे. उमेदवाराने अर्ज समक्ष जाऊन सादर करावे तपाला नाही आलेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यावी

मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)

निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 हजार रुपये एवढे मासिक वेतन देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त महानगरपालिकेकडून कोणताही भत्ता देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर समक्ष जाऊन सादर करायचा आहे. 

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 20 हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : 790 रुपये व जीएसटी 143 रुपये असे एकूण 933 रुपये

Leave a Comment