Bombay High Court Bharti 2025 : सातवी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! मुंबई उच्च न्यायालयाच्या मुळशाखेच्या स्थापनेवर उपयुक्त पदे भरण्यासाठी ही भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत असून ही भरती प्रक्रिया “स्वयंपाकी-नि-शिपाई” पदाकरिता होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत.
या पदासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराने त्यांच्या अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात सादर करायचे आहेत, अर्जासोबत कागदपत्रे, प्रमाणपत्र, पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सह 21 सप्टेंबर 2025 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहोचतील या बेतांनी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत.
स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्या माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांक नंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
पात्रता (Bombay High Court Bharti)
- उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा, उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास विहित मार्गाने अर्ज करण्यास शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वयामध्ये शेतीला मिळणार आहे, उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा मागासवर्गीयासाठी कमाल मर्यादा 43 वर्षाचे असेल.
अर्ज करण्याची पद्धत
- अर्जाचा नमुना खाली लिंक वर दिलेला आहे तो अर्जाचा नमुना डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून उमेदवाराने 300 रुपयांच्या पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट सहित पाठवायचा आहे.
निवड प्रक्रिया Bombay High Court Bharti 2025
- आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प सूची प्रमाणे पात्र उमेदवाराची मूल्यांकन पद्धत, तोंडी मुलाखत व शारीरिक कार्यक्षमता चाचणी घेऊन उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे.
पदांचा तपशील
- स्वयंपाकी-नि-शिपाई – 02 जागा
अर्जाचे शुल्क
- सदर पदासाठी तीनशे रुपये एवढे अर्जाचे शुल्क (Bombay Highcourt Bharti) असून हे शुल्क “Assistant Registrar for Registrar General High Court A.S. Bombay” यांच्या नावे काढलेले असावे. ही रक्कम पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपातच असावी .
आवश्यक कागदपत्रे
- उमेदवाराने अर्ज सोबत स्वक्षांकित केलेल्या छायांकित प्रति सादर करावेत यामध्ये
- जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /दहावीचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- चौथी, दहावी, बारावी किंवा तत्सव डिप्लोमा
- कोणत्याहि मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला.
- अर्जदाराला बनवता येणाऱ्या पाककृतीची यादी सोबत जोडावी.
- स्वयंपाकाच्या विशेषते संबंधीचा दाखला असल्यास अश्या उमदेवराला प्राधान्य देण्यात येईल.
- अधिवास प्रमाणपत्र
- उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
- विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला
- एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत पाठवावा.
- अर्ज सोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले पाच रुपयाच्या पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट पाठवावे.
पगार (Bombay High Court Bharti)
- निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 16600 ते 52400 व नियमाप्रमाणे भत्ते दिले जाणार आहेत
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- ४०००३२
उमेदवारासाठी सूचना
- जाहिरातीला अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची करण्याची सर्वाधिकार प्रशासन उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे राखून ठेवलेले आहे.
- अपूर्ण चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल तसेच कोणती वस्तूस्थिती दडपल्यास नाकारला जाईल.
- केवळ पात्र उमेदवारांना स्वयंपाक प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी दोन्ही मुलाखतीसाठी नेमलेले तारखांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
- उमेदवाराचे निवड हे स्वयंपाकाचे प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केले जाईल.
- उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी शैक्षणिक पातळीच्या बाबत माहिती भरताना उमेदवाराने त्याची तिची पात्रता खाली दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी
- चौथी
- दहावी
- बारावी किंवा तत्सम डिप्लोमा
- या निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेली निर्णय (Bombay Highcourt Bharti) अंतिम असेल.
- अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवाराची बंधनकारक आहे, उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या वैद्य कागदपत्रानुसार अचूक करायचे आहे.
- मुलाखतीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रति पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.
- पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा, स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी तसेच मुलाखतीसाठी नियोजितच तारखांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. ही भरती कोणासाठी आहे?
ही भरती प्रक्रिया “स्वयंपाकी-नि-शिपाई” पदाकरिता होणार पदांसाठी आहे.
2. एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
एकूण 01 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
3. अंतिम तारीख कोणती?
अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे.
4.अर्ज कसा करायचा?
अर्ज स्पीड पोस्टद्वारे ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

Hello mi raj suresh Devare hohil ka maz kam tumhi he jahirat dili aahe tar
Kam tar pahijel ho sagdya na bina kamach koni nahi rahu sakta kamchi pan garaj aahe