Driving Licence Online : वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढण्यासाठी आतापर्यंत आपल्याला खूप प्रॉब्लेम येत होते.
आता नवीन लायसन्स QR कोड सहित येत असून हे लायसन्स सर्व भारतभरात एकसारखेच असणार आहे त्यामुळे सर्व भारतात पाहिल्याप्रमाणेच वैध असेल. लायसन्स चा स्मार्ट कार्ड बदललेले असून आता नवीन स्मार्ट कार्ड आरटीओ कडून दिल्या जात आहे.
लायसन्स काढण्याची सर्व प्रोसेस आता सरकारने हे सुविधा एकदम ऑनलाइन करून टाकली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काही दिवसातच आपल्याला मिळते.
तुम्हाला आरटीओला जास्त फेऱ्या मारायची सुद्धा गरज पडत नाही हि सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे, त्याची टेस्ट सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच द्यायला लागेल. आणि कोणत्या प्रकारचे एजंटला तुम्हाला पैसे द्यायची गरज पडत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढणे एकदम सोपं जाणार आहे.
DL काढण्याची प्रोसेस (Driving License Rule 2025)
ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे ते खालील प्रोसेस संपूर्ण पहावी आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अर्ज सादर करावा.
ऑनलाईन अर्ज तुम्ही किरकोळ रकमेमध्ये सादर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एक्झाम असेल आणि स्मार्ट कार्ड सुद्धा मिळेल.
टेस्ट देण्याची गरज नाही
जर तुम्ही सरकारमान्य ड्राइविंग स्कूलमधून लायसन्स काढणार असाल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे परीक्षा देण्याची गरज नाही. तुम्ही थेट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकता, पहिले लर्निंग लायसन्स (Driving License Rule 2024) तुम्हाला काढायला लागेल लर्निंग लायसन्स काढल्यानंतर 90 दिवसाच्या आत तुम्ही पक्क्या लायसन्स साठी अर्ज करू शकता.
फोर व्हीलर चे लायसन्स जर काढत असाल तर तुम्हाला टेस्ट द्यावी लागते पण सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल मधून काढत असाल तर टेस्ट देण्याची गरज नाही,टू व्हीलर साठी कोणती टेस्ट देण्याची गरज इथे पडत नाही पण हे सर्व ज्या त्या आरटीओच्या नियमानुसार लागू असेल.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.नवीन ड्रायव्हिंग लायसन्समध्ये काय बदल झाले आहेत?
उत्तर : नवीन ड्रायव्हिंग लायसन्स आता QR कोडसह स्मार्ट कार्ड स्वरूपात दिले जाते, जे संपूर्ण भारतभर वैध आहे. हे लायसन्स एकसारखे असून आरटीओकडून अधिकृतपणे जारी केले जाते, त्यामुळे कोणत्याही राज्यात ते स्वीकारले जाते.
2: लायसन्ससाठी अर्ज कसा करायचा आणि किती वेळ लागतो?
उत्तर : लायसन्ससाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आहे आणि तुम्ही https://parivahan.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर काही दिवसांतच तुम्हाला लायसन्स मिळतो आणि स्मार्ट कार्ड पोस्टाने तुमच्या पत्त्यावर पाठवले जाते.
3.टेस्ट देणे आवश्यक आहे का?
उत्तर : जर तुम्ही सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतले असेल, तर तुम्हाला कोणतीही टेस्ट द्यावी लागत नाही. फोर व्हीलर साठी सामान्यतः टेस्ट आवश्यक असते, पण अधिकृत स्कूलमधून घेतल्यास ती टाळता येते. टू व्हीलर साठी अनेक आरटीओमध्ये टेस्टची गरज नसते, परंतु हे स्थानिक नियमांवर अवलंबून असते.
4. लर्निंग लायसन्स आणि पक्क्या लायसन्ससाठी काय कालावधी आहे?
उत्तर : तुम्हाला प्रथम लर्निंग लायसन्स काढावे लागते आणि त्यानंतर 90 दिवसांच्या आत पक्क्या लायसन्ससाठी अर्ज करता येतो. या कालावधीत वाहन चालवण्याचा सराव करणे आवश्यक आहे.
5.एजंटकडून लायसन्स काढणे आवश्यक आहे का?
उत्तर : नाही, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे एजंटकडून लायसन्स काढण्याची गरज नाही. यामुळे वेळ, पैसा आणि त्रास वाचतो आणि तुम्ही थेट सरकारी पोर्टलवरून अर्ज करून लायसन्स मिळवू शकता