Close Visit MahaNews12

IB : ग्रॅज्युएट तरुणांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स; इंटेलिजन्स ब्युरो मध्ये तब्बल 3717 पदांसाठी भरती, पगार..

इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गृहमंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरो मध्ये मेगा भरती जाहीर केली आहे. पदवी पास असलेल्या तरुणांना नोकरी मिळवण्याचे ही चांगली संधी आलेली आहे. IB Bharti 2025

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये असिस्टंट सेंट्रल ऑफिसर ग्रेड दोन/एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये तब्बल 3717 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने https://mha.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याचे प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरू झाल्या असून 10 ऑगस्ट 2025 पर्यंत हे अर्ज सादर करायचे आहेत. IB Recruitment 2025

पदाचे नाव व तपशील

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्यूटिव्ह (ACIO-II/EXE) – 3717 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण केलेले असावी. यासोबतच उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापेक्षा अधिक नसावे राखीव प्रवर्गाला नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल. वर नमूद केलेले वय हे 01 ऑगस्ट 2025 रोजी विचारात घेतले जाणार आहे.

अर्जाचे शुल्क

गुप्तचर विभागाच्या या पदभरती मध्ये ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यासोबतच त्याचे शुल्क सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहे. जर तुम्ही फॉर्म भरायचा विचार करत असाल तर सर्वसामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 650 रुपये शुल्क भरावे लागेल तर अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांना 550 रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे.

निवड प्रक्रिया

इंटेलिजन्स ब्युरोच्या या पदभरती मध्ये निवड होण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराला टियर – वन आणि टीयर दोनच्या परीक्षेला बसावे लागले. उमेदवारला दोन्ही टप्प्यात आवश्यक असणारे गुण मिळवणे गरजेचे आहे. त्यानंतर उमेदवारांना टीयर-थ्री परीक्षा/मुलाखत/व्यक्तिमत्व चाचणीमध्ये बसावे लागेल शेवटी सर्व गुणांचा आधारावर उमेदवाराची यादी तयार करण्यात येईल आणि अंतिम यादी स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांना रिक्त पदांसाठी नियुक्त केले जाईल.

मासिक वेतन (Intelligence Bureau Bharti 2025)

निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल सात अंतर्गत वेतन मिळेल जे कमीत कमी 44,900 रुपये ते 1,22,400 रुपये एवढे असेल याशिवाय केंद्र सरकार द्वारे मिळणारे भत्ते व इतर फायदे सुद्धा उमेदवाराला मिळणार आहेत.

अर्जाच्या शुल्कव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये किंवा कोणी नोकरी मिळवून देतो म्हणून पैसे उकळत असेल तर अश्या भूलथापांना बाली पडू नये. या भरती विषयीची अधिक माहिती https://mha.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तपासू शकता.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती केंद्र सरकारमार्फत संपूर्ण भारतभर राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : ऑनलाईन अर्ज सादर करावा, वर लिंक दिलेली आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 122000 रुपये पर्यंत पगार मिळेल.

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : 550 रुपये अर्ज शुल्क लागू राहील.

Leave a Comment