खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांसाठी थेट भरती सुरु;पगार 42000 रुपये | Khadki Cantonment Board Bharti

Khadki Cantonment Board Bharti : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये तरुण उमेदवारांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहे कोणतीही परीक्षा न देता या ठिकाणी नोकरी मिळणार आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील या भरतीसाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखतीला जाण्या अगोदर खाली दिलेली सविस्तर माहिती उमेदवारांनी वाचायची आहे त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.

पदांचा तपशील

  1. सहायक वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
  2. स्टाफ नर्स – 03 जागा
  3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 02 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  • सहायक वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस व एमएस्सी नोंदणीकृत असावा, आपत्कालीन केसेस हाताळण्याचा अनुभव असावा आणि वय जास्तीत जास्त 55 वर्ष असावे.
  • स्टाफ नर्स – मान्यता प्राप्त संस्थेतून जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल चे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – बीएससी (डीएमएलटी) किंवा बीएससी (एमएलटी) असणे आवश्यक आहे.

मासिक वेतन

या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन देण्यात येणार असून सहायक वैद्यकीय अधिकारी पदासाठी 75 हजार, स्टाफ नर्स साठी 28 हजार व लॅबोरेटरी तंत्रज्ञ साठी 28 हजार रुपये एवढे दरमहा वेतन देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे (KCB Bharti 2025)

  1. पदवीचे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र
  2. महाराष्ट्र नर्सिंग पार्सल मध्ये नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र
  3. अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र
  4. ओळखीचा पुरावा
  5. अलीकडच्या काळातील फोटो सोबत ठेवावा

मुलाखतीची तारीख व पत्ता

वरील सर्व पदासाठी 21 ऑगस्ट 2025 रुपये सकाळी 10 वाजेपासून मुलाखत घेण्यात येणार असून त्यासाठी उमेदवाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल खडकी पुणे-3 या ठिकाणी हजर राहायचे आहे. उमेदवारांनी आपली नोंदणी सकाळी 11 वाजेच्या आत करून घ्यावी. 11 वाजेनंतर ही नोंदणी बंद केल्या जाईल याची नोंद घ्यावी.

उमेदवारासाठी सूचना

  1. उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर सविस्तर जायला वाचावी व पात्रता धारण करत असल्याचा सादर करावा.
  2. आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेस सोबत घ्यावे, मूळ कागदपत्र आणि एक साक्षांकित प्रत सोबत ठेवणे आवश्यक राहील.
  3. अनुभव असलेल्या उमेदवारस या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अनुभव असल्यास पदभरतीचा लाभ घ्यावा.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1.ही भरती कोणत्या ठिकाणी आहे?

Ans : ही भरती पुणे जिल्ह्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये आहे.

2.मुलाखत कधी आहे होणार आहे?

Ans : मुलाखत 21 ऑगस्ट 2025 रोजी होईल.

3.भरती संदर्भात अडचण असल्यास कोणाला संपर्क साधावा?

Ans : भरती संदर्भात काहीही अडचण असल्यास 020-25819283 या नंबर वर तुम्ही संपर्क साधू शकता अथवा आवश्यक माहिती विचारू शकता.

4.उमेदवारीची नोंदणी कधी बंद होईल?

Ans : उमेदवाराच्या नोंदणी सकाळी 11 वाजता बंद होणार आहे.

5.हि पदभरती कशा स्वरूपाचे असेल?

Ans : हे पदे कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहेत.

Leave a Comment