Ladki Bahin Yojana 2025 : शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असेही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
पात्रता काय आहे?
१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
पुरुषांनी सुद्धा नोंदणी केली
अपात्र लाभार्थीमध्ये पुरुषही असून त्यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने नुकतेच प्रसिद्ध केले. २६.३४ लाख अपात्र पैकी काही एकापेक्षा जास्त योजनांचा लाभघेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या.
या आधारे जून २०२५ पासून या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभतात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या २.२५ कोटी लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेत असल्याची माहिती सादर केली. या अपात्र लाभार्थीना जूनपासून लाभस्थगित करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
जे पात्र त्यांनाच लाभ
तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख एवढ्या लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई, निर्णय लवकरच
शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असेही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
अपात्रतेची निकष काय आहेत.
खाली दिलेल्या निकषांच्या यादीमधील एक जरी गोष्ट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत, खालील यादी व्यस्थित वाचून तुम्ही पात्र आहेत कि नाही हे ठरवू शकता.
१. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
(FAQ) Frequently Asked Questions :
1.अपात्र महिलांना कधीपासून रक्कम मिळणार नाही?
Ans : जून २०२५ पासूनची रक्कम दिली जाणार नाही.
2.किती महिला लाभ घेऊ शकणार नाहीत?
Ans : प्रसिद्ध वृत्तानुसार २६.३४ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
3. सरकारतर्फे किती पैसे दिले जातात?
Ans : दरमहा 1500 रुपये सरकारकडून दिले जातात.
4.कोण महिला अपात्र आहेत?
Ans : वर दिलेल्या अपात्रतेची निकषात सर्व महिला अपात्र आहेत.
5.हा लाभ कसा दिला जातो?
Ans : हा लाभ थेट बँकेमध्ये जमा होतो.