ladki bahin yojana ekyc update : केवायसी केलेल्या लाडक्या बहिणीसाठी धक्कादायक बातमी ज्या लाडक्या बहिणीने आतापर्यंत KYC केलेली आहे अशा बहिणीसाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तुम्ही केवायसी केलेल्या संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात आला असून या डेट्याद्वारे तुमच्या उत्पन्नाची मर्यादा तपासण्यात येणार आहे आणि ज्या महिला यामध्ये अपात्र असतील त्या महिलांना या योजनेतून बाद केले जाणार आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीमधून एकूण जवळपास 52 लाख महिला या योजनेमधून बाद होणार आहेत. त्यामुळे सर्व महिलांनी आपली पात्रता तपासूनच केवायसी करून घ्यावी, केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली असून त्या अगोदर जर तुम्ही पात्र नसाल तर केवायसी करू नका तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते त्याबरोबरच तुम्हाला मिळालेले पैसे वसूल सुद्धा केले जाऊ शकतात.
कोणत्या महिला बाद होणार?
- ज्या घरामध्ये तीन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर
- ज्या महिलांच्या (सर्व कुटुंबातील मिळून) वार्षिक एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर
वडील किंवा पती ज्यांचा आधार क्रमांक दिलेला आहे त्यांच्याकडे चार चाकी गाडी असेल तर (ट्रॅक्टर वगळून) - संबंधित महिलांच्या घरचे सरकारी नोकरीमध्ये असतील किंवा जे सरकारी नोकरी मधून निवृत्ती घेतलेले आहे व निवृत्तीवेतन चालू असलेल्या घरातील महिला अपात्र होणार आहेत.
यादीत आपले नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी केवायसी केलेले आहे त्या सर्व महिलांचा डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात आला असून यामध्ये वार्षिक उत्पन्न तपासले जाणार आहे या उत्पन्नाच्या आधारे आतापर्यंत 52 लाख महिला बाद होण्याचे चान्सेस राहणार आहेत.
नाव कसे चेक करावे (Ladki Bahin Yojana List)
ज्या महिला बाद झालेल्या आहे त्या महिलांना आपले नाव तपासण्यासाठी आपल्या अकाउंट लॉगिन करून पाहावे लागेल त्यामध्ये जर तुमचा फॉर्म रिजेक्टेड मध्ये आला असेल किंवा पेमेंट कॅन्सल दाखवत असेल तर तुम्ही अपात्र आहात असे समजावे लागेल याची यादी काही दिवसांमध्ये संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.
ज्यावेळेस यादी प्रकाशित होईल तुम्हाला त्या पद्धतीने अपडेट दिली जाईल तसेच सरकार जे काही कारवाई करणार असेल त्या विषयाची माहिती सुद्धा आमच्या वेबसाईटवर व संकेतस्थळावर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तसेच टेलिग्राम ग्रुप ला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा.
यादीत आपले नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
लाडक्या बहिणीसाठी ही महत्त्वाची अपडेट होती कारण केवायसी करण्यासाठी आणखी भरपूर दिवस शिल्लक आहेत आणि ज्या महिला अपात्र असतील त्या महिला सुद्धा केवायसी करतील त्यामुळे अशा महिलांनी केवायसी करू नये ज्या महिलांना माहिती आहे की आपण अपात्र आहोत तर आपण केवायसी न करता तिथेच थांबावे आणि पुढील लाभ घेऊ नये, गरीब महिलांना लाभ मिळवून देणे त्यांना सुदृढ बनवणे या योजनेचा मूळ हेतू असल्यामुळे यामध्ये पडताळणी होणार आवश्यक होतं आणि तेच आता केलं जात आहे.
FAQ
1.शासनाने कोणता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे?
ज्या महिलांनी KYC पूर्ण केले आहे, त्यांचा संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
2.किती महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 52 लाख महिला या योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे
3.KYC करण्यासाठी अंतिम मुदत किती आहे?
31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC करण्याची मुदत आहे
4.पुढील माहिती कुठे मिळेल?
यादी व कारवाईसंबंधी माहिती सरकारी संकेतस्थळावर व आमच्या WhatsApp/Telegram ग्रुपवर उपलब्ध होईल
