Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! दिवाळी करा दणक्यात साजरी, सरकारने दिली खूशखबर

Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालीय.

राज्यातील अनेक आदिवासी भागातील महिलांनाही या पैशांच्या माध्यमातून अनेक गोष्टींमध्ये फायदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेबाबत मोठी प्रतिक्रिया दिली.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुण्यात ग्रामीण भागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. आदिवासी भागातील महिलांना या पैशांचा अनेक गोष्टींमध्ये फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

रमाई घरकुल आवास योजनेसाठी अर्ज सुरु; पात्रता व आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज | Ramai Awas Yojana 2024

महिलांनी स्वत:ची सुधारणा करण्यासाठी या पैशांचा वापर करावा. या योजनेच्या नोव्हेंबरच्या हफ्त्याचे पैसे ऑक्टोबर मध्ये देण्याचे नियोजन आहे, असं आश्वासनाही गोऱ्हे यांनी दिलं. त्या पुण्यात लाडकी बहीण विजय संवाद यात्रा या कार्यक्रमात बोलत होत्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 पासून महिलांना पैसे दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे.

ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलं होतं, त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना एकूण तीन हजार रुपये दिले गेले.

पण सरकारच्या नवीन नियमांनुसार, 1 सप्टेंबरपासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यातच लाभ मिळेल.

Ladki Bahin Yojana : ‘ही’ चूक आताच टाळा…नाहीतर 4500 हातातून गमावून बसाल

ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे,  त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे 3000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त 1500 रुपये दिले जातील, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना 3000 रुपये मिळाले आहेत. 1 सप्टेंबरच्या आधी अर्ज करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसै जमा झाले नाहीत.

अर्ज मंजूर झाल्यानंतरही या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाहीय. आधार नंबर बँक खात्याशी लिंक न झाल्याने किंवा अर्जात अन्य त्रुटी असल्याने महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही. पण ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांना योजनेचे पैसे मिळतील.

1 thought on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! दिवाळी करा दणक्यात साजरी, सरकारने दिली खूशखबर”

Leave a Comment