ladki bahin paise kadhi yenar : महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी गत वर्षी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. याद्वारे राज्यभरातील लाभार्थी महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महिलांना ऑक्टोबर २०२५पर्यंतचे हफ्ते देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व महिलांचे नोव्हेंबरच्या हफ्त्याकडे लक्ष लागले आहे. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिना उलटूनही अद्याप या महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले नाहीत. यामुळे या लाभार्थ्यांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये एकत्र मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन महिन्यांचे १५०० रुपये मिळून ३००० रुपये डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये जमा होणार आहेत.
कधी मिळणार 3,000 रुपये?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतर, महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा केले जाऊ शकतात. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये, म्हणजेच १५ ते ३१ डिसेंबर या काळात लाभार्थ्यांना हप्त्यांची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर झाली नाही.
मीरा भाईंदर महानगरपालिकेत नवीन भरती सुरु;त्वरित अर्ज करा | MBMC Bharti 2025
केवायसी करणे अनिवार्य
सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी (KYC) करणे गरजेचे केले आहे. यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. मात्र योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी न केल्यास त्यांना योजनेचा लाभमिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आदिती तटकरे यांची माहिती;नोव्हेंबर चा हप्ता यादिवशी अकाउंटला येणार | ladki bahin nov installment date 2025
FAQ
1.लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात?
दर महिन्याला पात्र महिलांना ₹1500 इतकी आर्थिक मदत दिली जाते.
2. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे का?
नोव्हेंबरचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही; तो डिसेंबरच्या हप्त्यासोबत मिळण्याची शक्यता आहे.
3. डिसेंबरमध्ये किती रक्कम मिळणार आहे?
नोव्हेंबर + डिसेंबर असे दोन महिन्यांचे मिळून ₹3000 जमा होण्याची शक्यता आहे.
4. पैसे कधी मिळतील?
स्थानिक निवडणुका व आचारसंहिता संपल्यानंतर, 15 ते 31 डिसेंबर दरम्यान रक्कम जमा होऊ शकते.
5. केवायसी (KYC) का आवश्यक आहे?
योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे; अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे.
