Mahila Bal Vikas Vibhag Bharti : महिला व बालविकास विभागात काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील संरक्षण अधिकारी “गट क” या संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली काही पदे भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती प्रक्रिया संदर्भात पदांचा तपशील, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पगार व इतर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
पदांचा तपशील
- Defense Officer (Junior) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)
पदसंख्या
- एकूण – 17 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- पुणे
पगार WCD Pune Bharti 2025
- S6 – निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19900/- ते 63200/- पर्यंत पदानुसार पगार देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे 08 डिसेंबर 2025, दुपारी 03:00 वाजेपासून ते 22 डिसेंबर 2025 रात्री 23:55 वाजे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी,उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर आपले शैक्षणिक पात्रता पाहून त्यानुसारच पदाची निवड करावी.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 08 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 22 डिसेंबर 2025 रात्री 23:55 वाजे पर्यंत
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- सदर सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे,उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
- प्रस्तुत भरती प्रक्रिये करिता केवळ संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज शुल्क/परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- तसेच या भरती प्रक्रिये संदर्भात सर्व कार्यक्रम, वेळापत्रकातील बदल इत्यादी बाबतच्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील,उमेदवारांशी भरती प्रक्रिये बाबत स्वतंत्रपणे पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
- भरती प्रक्रिया स्थगित करणे किंवा रद्द करणे त्यामध्ये अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण किंवा संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे, भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करणे, सामाजिक/समांतर/दिव्यांग इतर आरक्षणांमध्ये संवर्गनिहाय निहाय बदल करण्याचे, सरळ भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे, नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे, अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवलेले असून त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.
- भरती प्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना राहतील.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,अर्ज पाठवताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडायचे आहेत.
- अर्जदारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- भरती संदर्भात सविस्तर माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
1.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
22 डिसेंबर 2025 रात्री 23:55 वाजे पर्यंत
3.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
