Close Visit MahaNews12

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी !! त्वरित करा अर्ज | MCGM Bharti 2026

MCGM Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाईन पद्ध्तीने ( पोस्टाने किंवा प्रत्यक्ष ) सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ही भरती प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत राबवण्यात येत असून,उमेदवारांनी अर्ज 25 फेब्रुवारी 2026 ते 11 मार्च 2026 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील Brihanmumbai Municipal Corporation

  • बधिरिकरण तज्ञ (लहान शस्त्रक्रिया/मोठ्या शस्त्रक्रिया)

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणार आहे.
पदसंख्या Brihanmumbai Arogya Vibhag Recruitment 2026
  • एकूण – आठ रिक्त जागा
अर्ज करण्यासाठीचा पत्ता BMC Public Health Bharti 2026
  •  1) वैद्यकीय अधिकारी, सावित्रीबाई फुले माता व बाल मनपा रुग्णालय (रिद्धी गार्डन मनपा प्रसूतिगृह) न्य वेलटांईन अपार्टमेंट, रिद्धी गार्डन कॉम्प्लेक्स, दिंडोशी मालाड पूर्व, मुंबई 400097 या पत्त्यावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत पोहोचतील याची दक्षता घ्यावी.
  • 2) वैद्यकीय अधिकारी, आकुर्ली रोड, मनपा प्रसूतीगृह, दामूपाड/ केली पाडा, ठाकूर कॉलेजच्या मागे कांदिवली पूर्व, मुंबई-400101 या पत्त्यावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत पोहोचतील याची दक्षता घ्यावी.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/पदविका/डीएनबी धारण करणारा असावा.
  • पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर एक वर्षाचा अनुभव धारण करणारा असावा.
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र तसेच नूतनीकरण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
  • अतिरिक्त अर्हतेची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र नूतनीकरण आवश्यक असणार आहे.

पगार MCGM Bharti 2026

  • उमेदवारांना हा प्रस्तावित मानधनाप्रमाणे नियोजित वेळेपेक्षा जास्त झालेल्या वेळेसाठी जास्त मानधन या तत्त्वावर देण्यात येणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अटी व शर्ती पूर्ण करत असल्यास अर्ज सादर करायचे आहेत.
  • पॅनलवर बधिरिकरण तज्ञाची निवड करण्याचा अंतिम निर्णय हा माननीय कार्यकारी,आरोग्य अधिकारी सार्वजनिक आरोग्य खाते यांचा राहील.
  • बधिरिकरण /बालरोग तज्ञ /सोनोलोजिस्ट पॅनल वरील तज्ञांचे राहण्याचे ठिकाण प्रसूतीगृह/ रुग्णालयापासून शक्यतो जवळ असावे.
  • उमेदवारांनी अर्ज 25 फेब्रुवारी 2026 ते 11 मार्च 2026 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेले पत्त्यावर सादर करायचे आहेत.
  • ही भरती प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कंत्राटी तत्वावर होणार आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्ज नाकारण्यात येईल किंवा रद्द केला जाईल.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात 1येथे क्लिक करा
PDF जाहिरात 2येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment