MJP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया गट अ, ब आणि क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी होणार असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत पदानुसार सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ कॅडर – अंतर्गत
- लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी
- लेखा अधिकारी
- सहाय्यक लेखा अधिकारी
- सहाय्यक लेखापाल
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)
- उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर
- निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर
- कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक
- सहाय्यक स्टोअरकीपर
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
पदसंख्या (Maharashtra Jeevan Pradhikaran)
- एकूण – 290 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- महाराष्ट्र
पगार MJP Maharashtra Bharti 2025
- निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19900/- ते 177500/- पर्यंत पदानुसार पगार देण्यात येईल.
अर्ज शुल्क
- खुल्या वर्गासाठी- 1000/- आणि राखीव वर्गासाठी 900/-
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, 20 नोव्हेंबर 2025 ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात.
शैक्षणिक पात्रता
- भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
- 20 नोव्हेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 19 डिसेंबर 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना MJP Bharti 2025
- उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरच ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत, ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सदर संकेतस्थळावर प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक ती माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिली.
- उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक ती सर्व पात्रता पूर्ण केलेली असल्याची खात्री करूनच अर्ज सादर करावेत.
- परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व प्रवर्गनिहाय पदसंख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार, नियुक्ती प्राधिकारी व त्यांचे नियंत्रण अधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे, आरक्षणासंदर्भात सविस्तर माहिती उमेदवारांनी जाहिरातीमध्ये वाचावी.
- पद भरती पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या शासन निर्णय /शासन शुद्धिपत्रक/शासन अधिसूचना यानुसार सदर भरती निकषांमध्ये बदल होऊ शकतो.
- सदर भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर पूर्णतः अथवा अंशतः रद्द करण्याचे अधिकार किंवा बदल करण्याचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी राखून ठेवले आहेत.
- पात्र ठरलेल्या उमेदवाराला त्याने रजिस्टर केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर एसएमएस किंवा ई-मेलद्वारे निवड सूची / प्रतीक्षा यादी व नियुक्ती बाबत कळविण्यात येईल तसेच प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर निवडसूची/प्रतीक्षा यादी/नियुक्तीची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
- सदर पदांच्या भरती करिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल, ऑनलाइन परीक्षेची तारीख महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जदारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- भरती संदर्भात सविस्तर माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
1.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
19 डिसेंबर 2025
3.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.
