Created By : Rajesh Kanthi, Yavatmal, Maharashtra, Dated: 17 Sep 2025
Mudra Loan Apply Online : सर्वांनी अनेकदा Mudra Loan बद्दल ऐकलेले असेल परंतु हे लोन कसे बँकेतून मिळवायचे? एकंदरीत प्रक्रिया कशी असते याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते आणि म्हणूनच अनेकांना शासकीय योजनांचा लाभ आपल्याला घेता येत नाही.
जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर आजच्या या लेखांमध्ये आणि तुम्हाला मुद्रा लोन बद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. या माहितीमुळे तुम्ही लवकरच तुमच्या जवळपास असणाऱ्या बँकेमध्ये जाऊन या लोनसाठी अर्ज करू शकता आणि नवीन व्यवसाय अगदी कमी व्याजदरामध्ये सुरू करू शकता.
ज्या लोकांना छोटे उद्योग सुरू करायचे आहे,अशा लोकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना उपलब्ध आहे या लोनच्या माध्यमातून तुम्ही तुमचे भविष्य उज्वल करू शकता तसेच छोटा उद्योग मोठा बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलू शकतात. हे कर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया देखील खूपच सोपी आहे तसेच काही खाजगी बँकांना देखील आता हे अधिकार देण्यात आलेले आहे.
हे हि वाचा 👉👉 बांधकाम कामगारांना 5000 रुपये दिवाळी बोनस मिळणार; पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया येथे पहा Bandhkam Kamgar Diwali Bonus 👈👈
काही खाजगी बँकेच्या मदतीने तुम्ही सहजच मुद्रा लोन काढू शकतात आणि या बँकेचे व्याजदर देखील कमी आहे आणि म्हणूनच तुमच्या खिशाला परवडेल असे व्याजदर तुम्हाला आता बँकेला द्यावे लागेल आणि त्याबद्दल तुम्ही तुमचा छोटासा व्यवसाय नव्याने सुरू करू शकता.
या बँका तुम्हाला कमी व्याजदरामध्ये पुरवतात Mudra Loan.
जर तुम्हाला मुद्रा लोन घ्यायचे असेल तर आपल्या आजूबाजूला कोणत्या खासगी बँका आपल्याला हे लोन पुरवतात, याबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे. या बँकेच्या माध्यमातून तुम्ही सहज अर्ज करून मुद्रा लोन प्राप्त करू शकता.
कॉर्पोरेशन बँक, जे एन के बँक, बँक ऑफ बडोदा, अलाहाबाद बँक , आयडीबीआय बँक सिंडिकेट बँक, पंजाब अँड देना बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक तामिळनाडू बँक, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, सारस्वत बँक, एचडीएफसी बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक , स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या बँका तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा लोन सहजच पुरवू शकतात. जर तुमच्या आजूबाजूला वरील बँक यादीतील एखादी बँक जवळपास असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन सहजच मुद्रा लोन साठी अर्ज करू शकता.
मुद्रा लोन साठी अर्ज करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची देखील पूर्तता करावी लागेल ती कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
- आधार कार्डची झेरॉक्स कॉपी.
- पॅन कार्ड
- व्यवसाय कार्ड
- बँकचे पासबुक
- वयाचे प्रमाण पत्र
बँकेत मुद्रा लोन साठी अर्ज केल्यानंतर हा अर्ज साधारण 8 ते 10 दिवसांमध्ये पास होण्याची शक्यता असते. बँक अधिकारी तुमच्या अर्जाचा तसेच योग्य ते कागदपत्रांची तपासणी करून तुमचे लोन सहजच अप्रोव करू शकतात.
हे हि वाचा 👉👉 PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 2000 रूपये बँक खात्यावर जमा! 👈👈
या योजनेअंतर्गत अर्जदाराला 50हजार ते 10 लाखापर्यंत सहजच कर्ज उपलब्ध होते तसेच हे कर्ज प्राप्त करताना तुम्हाला आकर्षक व्याजदर तसेच देखील दिली जाते.
जर तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरत असाल तर तुम्हाला कर्जामध्ये सूट देखील दिले जाते, याउलट तुम्ही जर कर्ज वेळेवर फेडत नसेल तर अशावेळी तुम्हाला योग्य ते दंड व शिक्षा देखील होऊ शकते. त्यात असेच केल्याने तुमचा सिविल स्कोर खराब होऊ शकतो व भविष्यात तुम्हाला कोणती बँक कर्ज देऊ शकत नाही, याची देखील तुम्ही काळजी घ्यायला हवी.
भारतातील छोटे उद्योग यांना चालना व गती मिळावी या अनुषंगाने प्रधानमंत्री मुद्रा लोन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या लोनच्या माध्यमातून छोट्या छोट्या उद्योग करताना सुवर्णसंधी मिळणार आहे. या लोनच्या माध्यमातून छोटे व्यवसायिक स्वतःला सिद्ध करू शकतील व आपल्या आर्थिक प्रगती साधू शकतात.
FAQ
1. अर्ज केल्यानंतर किती दिवसात लोन मिळते?
साधारणतः ८ ते १० कार्यदिवसांत बँक तुमचा अर्ज तपासून लोन मंजूर करते.
2. व्याजदर किती असतो?
बँकेनुसार व्याजदर वेगवेगळा असतो, पण सामान्यतः तो इतर कर्जांपेक्षा कमी असतो. वेळेवर हप्ता भरल्यास सूट मिळू शकते.
3. कर्ज न फेडल्यास काय होऊ शकते?
हप्ता वेळेवर न भरल्यास दंड आकारला जातो आणि तुमचा सिव्हिल स्कोर खराब होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळवणे कठीण होऊ शकते.
4. कोण अर्ज करू शकतो?
जे लोक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात किंवा विद्यमान व्यवसाय वाढवू इच्छितात, ते मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये दुकानदार, सेवा पुरवणारे, लघुउद्योग, महिला उद्योजक यांचा समावेश होतो.
5. मुद्रा लोनसाठी अर्ज कसा करायचा?
तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन किंवा संबंधित बँकेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सोबत द्यावी लागतात.
Source : Google News