NMMC Recruitment 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेचा (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025) आरोग्य विभागाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
खाली नमूद केल्याप्रमाणे विविध पदांसाठी ही भरती जाहीर केली असून यासाठी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, अर्ज करण्या अगोदर खाली दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतर जाहिरातीमध्ये दिलेल्या पात्रता व अटी पूर्ण करत असल्यास 20 ऑगस्ट 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत.
पदांचा तपशील
फिजिशियन,नेत्ररोग तज्ज्ञ,मानसोपचार तज्ज्ञ व नाक कान घास तज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर असावा, त्यासोबत महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिकल ची नोंदणी बंधनकारक आहे. शासकीय किंवा खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक राहील.
अर्ज भरण्याच्या सूचना (NMMC Bharti 2025)
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्रातुन संदर्भित केलेल्या रुग्णांना विशेषतज्ञ सेवा उपलब्ध करुन दयावयाची असल्याने इच्छुक असलेल्या विशेषतज्ञ डॉक्टरांनी वरील सेवा शर्तीची पुर्तता करुन लिफाफे होकारपत्र सिलबंद पाकीटात दि. 5/08/2025 सकाळी 10.00 पासुन ते दि 20/08/2025 दुपारी 3.00 पर्यंत वाजेपर्यंत आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय येथे सादर करावे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख
उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून हे अर्ज 20 ऑगस्ट 2025 पूर्वी आरोग्य विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय येथे सादर करावे.
वेतन (NMMC Recruitment 2025)
या पद्भारतीमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला प्रति व्हिजिट 2000 रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.
अटी आणि शर्ती
- सल्लागाराने अर्ज आणि परिशिष्ट अ सोबत खालील कागदपत्रे सादर करावीत अ) रेझ्युमे ब) एमबीबीएस आणि पदव्युत्तर किंवा डिप्लोमाची पात्रता प्रमाणपत्रे क) नूतनीकरणासह महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोंदणी ड) अनुभव प्रमाणपत्र.
- सल्लागार वेळापत्रकानुसार उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- सर्व कागदपत्रे स्वयं-प्रमाणित असावीत.
- आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांना कोणतेही कारण न देता कोणताही प्रस्ताव पूर्णपणे किंवा त्याचा काही भाग स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असेल. नवी मुंबई महानगरपालिकेला 15 व्या वित्त मध्ये NUHM नुसार मानधन आधारावर आणि प्रत्येक भेटीवर सल्लागार सेवा प्रदान केल्या जातात.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. ही भरती कोणत्या विभागासाठी आहे?
उत्तर: ही भरती नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रांमध्ये विशेषतज्ञ सेवा देण्यासाठी.
2. शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB/Diploma), महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक व संबंधित क्षेत्रातील शासकीय/खाजगी अनुभव आवश्यक
3. निवड झाल्यास मानधन किती मिळेल?
उत्तर: निवड झालेल्या सल्लागार डॉक्टरांना प्रत्येक व्हिजिटसाठी ₹2000/- मानधन दिले जाईल.
4. सल्लागार सेवा कशा प्रकारे दिल्या जातात?
उत्तर: NUHM अंतर्गत 15व्या वित्त आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सल्लागार सेवा प्रत्येक भेटीवर आधारित असते. सल्लागारांनी वेळापत्रकानुसार उपलब्ध असणे आवश्यक आहे.
5. भरतीसंदर्भात अंतिम निर्णय कोणाचा असेल?
उत्तर: आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांना कोणतेही कारण न देता कोणताही अर्ज स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आहे.