Close Visit MahaNews12

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा | Patbandhare Vibhag Bharti

Patbandhare Vibhag Bharti : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज 14 ऑगस्ट 2025 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रिया संदर्भात पदांचा तपशील, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व इतर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

पदांचा तपशील

  •  कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता

पदसंख्या

  • एकूण -05 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
  • नाशिक

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे 14 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 14 ऑगस्ट 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • कार्यकारी अभियंता, स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी इमारत दिंडोरी रोड, नाशिक-422004
शैक्षणिक पात्रता
  • उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

मीरा भाईंदर महानगरपालिकेत 130 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर; पगार 18 ते 75 हजार | MBMC Recruitment 2025

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही  मुलाखतीद्वारे होणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवारांनी अर्ज दिनांक 31 जुलै 2025 ते 14 ऑगस्ट 2025 पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचतील याप्रमाणे प्रत्यक्ष किंवा पोस्टाने सादर करावेत.
  • अर्जाच्या पाकिटावर कनिष्ठ अभियंता या पदाकरिता करार पद्धतीने नेमणूक करणे बाबत असे स्पष्ट लिहावे.
  • विहित नमुन्यातील अर्ज व अटी कार्यकारी अभियंता, स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी, नाशिक यांचे कार्यालयातील सूचना फलकावर प्रत्यक्ष पाहावयास मिळतील.
  • उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचूनच पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावेत.
  • अर्धवट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्ज पाठवताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडायचे आहेत आणि दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उपरोक्त अटी व शर्ती व्यतिरिक्त शासन /नियुक्ती अधिकारी वेळोवेळी ठरवतील त्या अटी व शर्ती अंतिम राहतील.
  • अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण नसावे याबाबत अर्जदारांनी ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहे त्या संबंधित कार्यालयाकडून तसेच प्रमाणपत्र प्राप्त करून सादर करणे बंधनकारक राहील.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

Leave a Comment