पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा एकदा 13 नवीन जागांसाठी भरती सुरु!! | PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri Chinchwad Municipal Corporation) विविध पदांसाठी भरतीच्या नवीन जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्जाचा नमुना व इतर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी आणि पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. या भरतीतील पदे ही मुलाखती द्वारे भरली जाणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, 03 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज समक्ष जाऊन जमा करावेत यासाठी सविस्तर जाहिराती खालील दिलेल्या आहेत त्या वाचाव्यात.

पदांचा तपशील व इतर माहिती

  1. समुपदेशक – 13 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  • UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल /समुपदेशन मानसशास्त्रात नियमित पदव्युत्तर पदवी. किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय आणि मानसोपचार /कौटुंबिक आणि बालकल्याण या विषयातील स्पेशलायझेशनसह नियमित MSW (मास्टर इन सोशल वर्क). किंवा UGC मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मानसशास्त्र (०६ युनिट), सामाजिक कार्य (०६ युनिट) मध्ये नियमित पदवी आणि मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मार्गदर्शन आणि समुपदेशनाचा डिप्लोमा.
  • किशोरवयीन मुलांसोबत काम करण्याचा किमान १ वर्षाचा अनुभव
  • शाळा समुपदेशक म्हणून काम करण्याचा किमान १ वर्षाचा अनुभव अनुभव
  • प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्याचा अनुभव
  • संगणक कौशल्ये तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक

वयोमर्यादा (PCMC Bharti 2025)

वर नमूद केलेल्या सर्व पदासाठी उमेदवाराचे वय जाहिरातीच्या दिनांकास कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 35 वर्ष इतकि राहणार आहे.

महावितरण भरती 2025 | 300+ रिक्त जागा | कमीत कमी 10वी पास आवश्यक | Mahavitaran Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत (PCMC)

ही निवड थेट मुलाखती द्वारे होणार असून यासाठी वर नमूद केलेल्या तीन पदासाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे. हे अर्ज तुम्ही स्वतः जाऊन जमा करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वर नमूद केलेल्या तीन पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2025 आहे. हे अर्ज तुम्हाला जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव येथे जमा करायचे आहेत.

मानधन

उमेदवाराला दरमहा 35000 एवढे मानधन देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त कोणताही भत्ता किंवा इतर लाभ देय राहणार नाहीत.

इतर आवश्यक सूचना (PCMC Bharti 2025)
  •  सदरची निवड ही समुपदेशक पदासाठी केवळ तात्पुरत्या एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपाची आहे. उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. सदरचे पद हे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ या करीता व आवश्यकतेनुसार राहील.
  • निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरीक्त मनपा मार्फत देण्यात येणाऱ्या कोणत्याही सोयी सुविधा हक्क व इतर आर्थिक लाभ व भत्ते देय राहणार नाहीत. (उदा. दिवाळी बोनस तथा सानुग्रह अनुदान इ.)
  • अर्जदाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर तसेच नियुक्ती झाल्यानंतरही अर्जदार विहित अर्ज/पात्रता धारण न करणारा, गैरवर्तन करताना दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास संबंधिताची उमेदवारी अथवा निवड रद्द करणेत येईल, तसेच काही आक्षेप आढळल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करणेत येईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या समक्ष जमा करायचा आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 35 हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.

4.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.

Leave a Comment