PCMC Bharti 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीच्या नवीन जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्जाचा नमुना व इतर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी आणि पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. या भरतीतील पदे ही मुलाखती द्वारे भरली जाणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
14 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज पोस्टाने अथवा समक्ष जाऊन जमा करावेत त्यानंतर 20 व 21 तारखेला पदानुसार मुलाखती घेतल्या जातील यासाठी सविस्तर जाहिराती खालील दिलेल्या आहेत त्या वाचाव्यात.
पदांचा तपशील व इतर माहिती
- पशुवैद्यकीय अधिकारी (ABC सर्जन) – 04 जागा
- लाईव्ह स्टॉक सुपरवायझर – 01 जागा
- डॉग पिग कुली – 10 जागा
- केमिस्ट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता व इतर निकष
- पशुवैद्यकीय अधिकारी : पशुवैदकशास्त्रामधील पदवी उत्तीर्ण आवश्यक,श्वान संतती नियमन कार्यक्रमांतर्गत किमान सहा महिने कामकाजाचा अनुभव आवश्यक.
- लाईव्ह स्टॉक सुपरवायझर : शासनमान्य संस्थेकडील पशुवैदक शास्त्रातील किमान पदविका उत्तीर्ण आवश्यक किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठातील लाइव स्टॉक सुपरवायझर कोर्स उत्तीर्ण असावा. श्वान संतती नियमन कार्यक्रमांतर्गत कमीत कमी सहा महिने कामकाज केल्याचा अनुभव असावा.
- डॉग पिग कुली : इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, शारीरिक कष्टाची कामे करण्यात सक्षम असणे आवश्यक. श्वान संतती नियमन कार्यक्रमांतर्गत किमान सहा महिने काम केल्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- केमिस्ट : मान्यता प्राप्त विद्यापीठाकडे मायक्रोबायोलॉजी केमिस्ट्रीमेंट सायन्स या विषयावरील एमएससी पदवी अथवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आणि शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील असिस्टंट केमिस्ट किंवा समकक्ष पदावर तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (PCMC Recruitment 2025)
वर नमूद केलेल्या सर्व पदासाठी उमेदवाराचे वय जाहिरातीच्या दिनांकास कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 38 वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी 43 वर्ष इतकि राहणार आहे.
एखाद्या पदासाठी आवश्यक पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास वयोमर्यादेची अट शिथिल करून उपलब्ध उमेदवारांमधून अनुभवी उमेदवारांना संधी देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत (PCMC)
ही निवड थेट मुलाखती द्वारे होणार असून यासाठी वर नमूद केलेल्या तीन पदासाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे. हे अर्ज तुम्ही पोस्टाने किंवा स्वतः जाऊन जमा करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
वर नमूद केलेल्या तीन पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2025 आहे. हे अर्ज तुम्हाला मा.आयुक्त कक्ष,पशुवैद्यकीय विभाग,चौथा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे 18 येथे जमा करायचे आहेत.
मुलाखतीची तारीख
वरील नमूद केलेल्या तीन पदासाठी मुलाखत 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येईल तर चौथ्या पदासाठी मुलाखत 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. वर नमूद केलेले चौथे पद हे पाणीपुरवठा विभागांमध्ये असणार आहे.
इतर आवश्यक सूचना (PCMC Bharti 2025)
- मुलाखती करिता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र व अनुभव बाबतच्या आवश्यक कागदपत्राचे मूळ प्रती व दोन साक्षांकित केलेल्या प्रतीचे संच सादर करणे आवश्यक आहे.
- निवड केलेल्या उमेदवारांना महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या अटी शर्ती नुसार कामकाज करणे बंधनकारक राहील त्याप्रमाणे काम करण्यास नकार दिल्यास नेमणूक रद्द करण्यात येईल.
- अर्ज सादर केल्यानंतर 21 तारखेला उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल याविषयीची माहिती उमेदवाराला मोबाईलवर किंवा ईमेल आयडीवर कळवण्यात येईल.
- उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी सकाळी 10 ते 11 या वेळेत हजर राहायचे आहे त्यानंतर आलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | पद क्रमांक 1 ते 3 | पद क्रमांक 4 |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Question)
1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.
2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 18 ते 85 हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.
4.निवड कशी होईल?
Ans : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.